मुंबई ऊर्जा प्रकल्पाबाबत विजय वडेट्टीवारांची भेट; हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता
By वैभव गायकर | Published: November 21, 2023 05:55 PM2023-11-21T17:55:30+5:302023-11-21T17:56:40+5:30
मुंबई ऊर्जा प्रकल्प प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटम्याची शक्यता आहे.
पनवेल: टेंभोडे गावातुन जाणाऱ्या मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत टॉवरला पनवेल मधील स्थानिक प्रकल्पबाधितांचा विरोध होत आहे.शनिवार दि.18 रोजी या प्रकल्पाचे काम देखील बंद पाडले.जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची देखील याप्रकरणात भेट घेण्यात आली.मात्र याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दि.21 रोजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची विधानभवनात भेट घेतली.
नुकत्याच झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांना पोलीस बलाचा वापर केला.याबाबत देखील वड्डेट्टीवर यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट फोन वर चर्चा केली.मुंबई ऊर्जा प्रकल्पाला आमचा विरोध नाही मात्र या प्रकल्पाचे टॉवर वनविभागाच्या पर्यायी जागेत उभारावे अशी आग्रही मागमी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केली आहे.वडेट्टीवार यांना देखील निवेदन देण्यात आले.यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील,जे एम म्हात्रे ,बबन पाटील,सुदाम पाटील,आर सी घरत ,प्रकाश म्हात्रे,हेमराज म्हात्रे ,ऍडव्होकेट प्रशांत पाटील आदींसह वळवली टेंभोडे येथिल प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटम्याची शक्यता आहे.
दरम्यान मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे संचालक निनाद देसाई यांनी संबंधित प्रकल्प शासनाच्या ऊर्जा धोरणानुसारच सुरु असल्याची प्रतिक्रिया दिली.