साजगाव रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण
By admin | Published: March 22, 2016 02:27 AM2016-03-22T02:27:24+5:302016-03-22T02:27:24+5:30
खालापूर तालुक्यातील ताकई ते साजगाव व साजगाव ते आडोशी हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्याचा त्रास या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
खामगाव : कामधंदा करण्याकरिता समजावित असलेल्या वडिलांचा रागाच्याभरात खून केल्याप्रकरणी पुत्रास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल सोमवारी खामगाव न्यायालयाने दिला. नांदुरा तालुक्यातील खळदगाव येथे रामभाऊ कुटे (वय ६५), पत्नी तुळसाबाई रामभाऊ कुटे (वय ३५) यांचे कुटुंब वास्तव्याला होते. रामभाऊ कुटे यांचा विवाहित मुलगा संतोष काही कामधंदा करीत नसल्याने त्याची पत्नी घर सोडून निघून गेली होती. ४ एप्रिल २0११ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास वडील समजावून सांगत असताना संतोषने वडिलांसोबत वाद करून मोठा दगड उचलून त्याने वडिलांच्या डोक्यावर मारल्याने रामभाऊ कुटे यांचा मृत्यू झाला होता. अशा आशयाची तुळजाबाई कुटे यांच्या तक्रारीवरून ५ एप्रिल रोजी पिंपळगावराजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली व दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची सोमवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम.एम. अग्रवाल यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यात ४ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदश्री मृताची पत्नी, मंगेश सातव, ठाणेदार उमेश पाटील यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी अभियोक्ता जे.एम. बोदडे यांचा युक्तीवाद व साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून संतोष कुटे यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.