शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

बारबालांविरोधात शिरवणे ग्रामस्थांनी सुरू केली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:05 AM

वाढत्या बारबालांच्या संख्येमुळे चिंतित असलेल्या शिरवणे ग्रामस्थांनी गावाची प्रतिमा सुधारण्यासाठी बारबाला हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सोमवारी गावात जनजागृती रॅली काढून बारबालांना घरे भाड्याने न देण्याचा संदेश देण्यात आला.

नवी मुंबई : वाढत्या बारबालांच्या संख्येमुळे चिंतित असलेल्या शिरवणे ग्रामस्थांनी गावाची प्रतिमा सुधारण्यासाठी बारबाला हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सोमवारी गावात जनजागृती रॅली काढून बारबालांना घरे भाड्याने न देण्याचा संदेश देण्यात आला. तसेच सद्यस्थितीला गावात राहणाऱ्या बारबालांना दोन महिन्यात घरे खाली करण्याचाही इशारा देण्यात आला.सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी उच्चशिक्षितांचे गाव म्हणून परिचित असलेल्या शिरवणे गावाची प्रतिमा सध्या मलीन होत चालली आहे. मागील दोन दशकांपासून गावात बारबालांची संख्या कमालीची वाढली आहे. गावात तसेच गावाभोवती झालेल्या गरजेपोटी बांधकामातील घरे भाड्याने देवून अनेकांनी उदरनिर्वाहाचे साधन निर्माण केले आहे. परंतु जास्त भाडे मिळावे याकरिता दलालांच्या आमिषाला बळी पडून बारबालांना देखील भाड्याने दिली जावू लागली आहेत. कालांतराने नवी मुंबईसह पनवेलमधील बहुतांश बारमध्ये काम करणाºया बारबालांचे वास्तव्याचे ठिकाण शिरवणे गाव बनले आहे. शिरवणे ग्रामविकास मंडळ व ग्राम विकास युवा मंच यांनी एकत्रित येवून मागील काही दिवसात गावकीच्या तीन बैठका घेतल्या. त्यात गावामध्ये बारबालांचे वास्तव्य वाढल्याने होत असलेल्या परिणामाची माहिती ग्रामस्थांना पटवून देण्यात आली. अखेर सोमवारी सकाळी सर्वपक्षीय ग्रामस्थांची बैठक घेवून बारबाला हटाव मोहिमेचा ठराव करण्यात आला. त्यानुसार बैठकीनंतर संपूर्ण शिरवणे गावामध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिला, पुुरुष, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक घर मालकाची भेट घेवून बारबालांना घर भाड्याने देवू नका असा संदेश दिला. सध्या राहत असलेल्या बारबालांना दोन महिन्यात घर खाली करण्याचाही इशारा देण्यात आला.बारबालामुक्त शिरवणे गावासाठी झालेल्या बैठकीस नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, सुधागड पाली पंचायत समितीचे सभापती जितेंद्र म्हात्रे, नगरसेविका माधुरी सुतार, रोहिणी भोईर, परिवहन सदस्य श्रीकांत भोईर, दक्षता समितीच्या रमा जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेश पाटील, ठाकूर भोईर, अनिल पाटील, जयेंद्र सुतार, प्रभाकर ठाकूर तसेच युवा मंचचे अध्यक्ष महेश पाटील, अविनाश सुतार, दिनेश ठाकूर, प्रमोद भोईर तसेच अमोल पाटील व सहकारी यांच्या प्रयत्नाने ही मोहीम सुरू झाली आहे.गावाच्या हितासाठी उभारलेल्या बारबाला हटाव मोहिमेला ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पूर्वी उच्चशिक्षितांचे गाव म्हणून परिचित असलेले शिरवणे गाव सध्या बारबालांचे गाव म्हणून ओळखले जावू लागले आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी ज्येष्ठ व तरुण एकत्रित मोहीम हाताळत आहेत. त्यात यश निश्चित असून पुढील काही दिवसात शिरवणेतून बारबालांचे अस्तित्व मिटलेले असेल.- प्रभाकर ठाकूर, खजिनदार, ग्रामविकास मंडळशिरवणे गावात पूर्णपणे बारबाला मुक्तीसाठी मोहीम उभारण्यात आली आहे. बारबालांच्या वाढत्या संख्येमुळे शिरवणे गावाची ओळख बारबालांचे गाव म्हणून होत चालल्याची खंत आहे. त्यांच्या नादी लागून तरुण मुले गैरमार्गाला जात आहेत. या तरुणाईचे भवितव्य वाचवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजूट होवून मोहीम हाती घेण्यात आली आहे.- ठाकूर भोईर,उपाध्यक्ष, ग्रामविकास मंडळबारबालांच्या गैर कृत्यांचा परिणाम गावातील महिला व मुलींवर उमटत आहे. बारबालांच्या शोधात येणारे आंबटशौकिन गावातील सामान्य महिला व मुलींकडे देखील त्याच नजरेने पाहत आहेत. यामुळे वाद उद्भवत असून गावाची शांतता भंग होत चालली आहे. त्यामुळे घर मालकांमध्ये जनजागृती करून बारबालामुक्त शिरवणे गाव अभियान हाती घेतले आहे.- जयेंद्र सुतार,सचिव, ग्रामविकास मंडळबारबालांमुळे संपूर्ण शहरात शिरवणे गावाची प्रतिमा डागाळत चालली आहे. तरुणाई देखील वाममार्गाकडे वळत आहेत. या परिस्थितीत सुधार घडवण्यासाठी सोशल मीडियाच्या आधारे उभारलेली मोहीम आज गावकीचा ठराव झालेली आहे. प्रत्येकालाच महिला, मुलींसह मुलांच्या भविष्याची चिंता सतावू लागल्याने बारबालांविरोधात मोहीम तीव्र झाली आहे.- अविनाश सुतार,कार्याध्यक्ष, युवा मंच

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई