नेरळ : कर्जत नगरपालिके च्या विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्र मासाठी काढलेल्या निमंत्रण पत्रिकेत शासकीय प्रोटोकॉलला छेद दिला असून, शिवसेनेचा पक्षीय कार्यक्र म असल्यासारखी निमंत्रण पत्रिका काढण्यात आल्याची चर्चा सध्या कर्जत शहरात आहे. कार्यक्र माची निमंत्रण पत्रिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर करून घेतलेली नाही.कर्जत शहरात विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यांचे नाव सर्वात वर आहे. त्यानंतर कार्यक्र माच्या अध्यक्षा म्हणून नगराध्यक्षा रजनी गायकवाड यांचे नाव आहे. यानंतर प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांचे नाव असून, त्या सोबत स्थानिक आमदार सुरेश लाड त्याखाली खासदार श्रीरंग बारणे त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर यांचे नाव आहे. कार्यक्र म पत्रिकेत मनोहर भोईर यांना जर निमंत्रण पत्रिकेत स्थान असेल तर जिल्ह्यातील अन्य आमदारांची नावे देखील यामध्ये हवी होती, असे कर्जत शहरातील नागरिकांकडून बोलले जात आहे. शिवसेनेच्या पक्षीय प्रोटोकॉलमध्ये खासदारांपेक्षा संपर्क प्रमुख मोठे असू शकतात. पण शासकीय प्रोटोकॉलमध्ये खासदारांपेक्षा पडद्यावरच्या होममिनिस्टरची वटच जास्त असल्याचे निमंत्रण पत्रिकेत दिसून येत असून तशी चर्चाही कर्जत शहरात सुरू आहे. नगरपालिकेच्याप्रोटोकॉलमध्ये असे करणे योग्य नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.(वार्ताहर)स्थानिक स्वराज्य संस्थांनी किंवा जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय विभागाने आपल्या विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्र माची निमंत्रण पत्रिका करताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ते मंजूर करून घेण्याचे आदेश असताना कर्जत नगरपालिके च्यामुख्याधिकाऱ्यांनी शासकीय आदेशाची पायमल्ली केली असून या प्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांना माहिती दिली आहे.- सुरेश लाड, आमदार, कर्जतकर्जत शहरातील विकासकामांचा भूमिपूजनाचा कार्यक्र म जवळ आला होता त्यामुळे घाईघाईत ही निमंत्रण पत्रिका काढण्यात आली आहे. त्यामुळे निमंत्रण पत्रिकेत लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही व पत्रिका ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर करून घेतली नाही, यात आमची चूक झाली आहे.- दादासाहेब आटकोरे, मुख्याधिकारी, नगरपालिका, कर्जत
कर्जत नगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत शासकीय नियमाचे उल्लंघन
By admin | Published: May 04, 2017 6:05 AM