दिवाळीच्या सुट्टींमुळे मतदार निघाले गावी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 12:32 AM2019-10-20T00:32:24+5:302019-10-20T05:25:44+5:30
मतदानावर होणार परिणाम?
नवी मुंबई : शहरातील अनेक शाळांच्या सहामाही परीक्षा संपल्या असून विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टी सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची गावी जाण्याची तयारी सुरू झाली असून शुक्रवारी संध्याकाळपासूनच लगबग सुरू झाली आहे. सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी विधानसभेची निवडणूक असून मतदारांच्या गावी जाण्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होणार आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, निवडणूक काही तासांवर येऊन ठेपली आहे. विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा झाल्या असून, अनेक शाळांचे निकालही जाहीर झाले आहेत. काही दिवसांवर दिवाळी आल्याने शाळांना असलेल्या सुट्टींमुळे निवडणुकीला प्राधान्य न देता नवी मुंबईतील मतदार गावी निघाले आहेत. निवडणुकीत मतदान न करता मतदारांच्या गावी जाण्यामुळे मतदानाच्या टक्क्यात फरक पडणार आहे.