मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 02:27 PM2024-11-19T14:27:44+5:302024-11-19T14:28:54+5:30
राज्यात प्रथमच हे अभियान राबविण्यात येत असून पिंक मतदान केंद्राच्या धर्तीवर उपक्रम राबविले जात आहेत.
वैभव गायकर
पनवेल : लोकशाहीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध कार्यक्रम जात असून, पनवेल मतदारसंघ राज्यात मतदान केंद्राचे रोल मॉडेल ठरणार आहे. पनवेलमधील ६०४ केंद्रांपैकी १० केंद्रांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
राज्यात प्रथमच हे अभियान राबविण्यात येत असून पिंक मतदान केंद्राच्या धर्तीवर उपक्रम राबविले जात आहेत. कळंबोली येथील सुधागड शाळेत वारकरी थीम असून मतदारांना तुळशीच्या एक हजार रोपांचे वाटप करून त्यांना चंदनाचा टिळा लावण्यात येणार आहे. यावेळी कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिसणार आहेत.
मतदार जनजागृतीसाठी पनवेल महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार संजय भालेराव यांच्यासह टीम कार्यरत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या समाज विकास अधिकारी स्वप्नाली चौधरी हे काम पाहात आहेत.
...या ११ केंद्रांना विशेष दर्जा
पालीदेवद सेंट मेरू स्कूल (गडकिल्ले थीम)
चिंघ्रण राजिप शाळा, चिंध्रन ( पारंपरिक वस्त्रे)
विंचुबे राजिप शाळा, (पॅरिस ऑलिम्पिक)
खैरणे राजिप शाळा, (माझी वसुंधरा थीम)
वावंजे राजिप शाळा, (महिला सक्षमीकरण)
आकुर्ली राजिप शाळा, (विठ्ठलवारी )
न्यू पनवेल सेंट जोसेफ स्कूल (ऑलिम्पिक)
कळंबोली सुधागड शाळा (वारकरी थीम)
न्यू पनवेल सीकेटी कॉलेज, खांदा कॉलनी (छत्रपती शिवाजी महाराज थीम)
खारघर गोखले हायस्कूल
(टेक्सटाइल महाराष्ट्र)
नेरे राजिप शाळा, नेरे (वारली पेंटिंग)