उरण तालुक्यातील ६१ मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्य रवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 09:58 PM2022-12-17T21:58:42+5:302022-12-17T21:59:12+5:30

रविवारी होणाऱ्या तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांच्या मतदानासाठी पोलिस बंदोबस्तात ठिक ठिकाणी रवाना करण्यात आले.

voting material sent to 61 polling stations in uran taluka under police security | उरण तालुक्यातील ६१ मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्य रवाना 

उरण तालुक्यातील ६१ मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्य रवाना 

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : रविवारी होणाऱ्या तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांच्या मतदानासाठी पोलिस बंदोबस्तात ठिक ठिकाणी रवाना करण्यात आले असल्याची माहिती उरणनिवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेसाठी ६१ मतदान केंद्र आहेत.या ६१ मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पाडण्यासाठी ३६६ कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी (१७) उरण तालुक्यातील पाणजे, डोंगरी, रानसई,पुनाडे,सारडे,नवीन शेवा, धुतुम,करळ, कळंबुसरे , बोकडविरा , वशेणी,पागोटे,पिरकोन, जसखार, चिर्ले,भेंडखळ,नवघर  आदी १७ ग्रामपंचायत मध्ये वोटिंग मशिन, मतदान साहित्य  पोलिस बंदोबस्तात पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

Web Title: voting material sent to 61 polling stations in uran taluka under police security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.