शहरातील मंदिरांत विठूरायाचा जयघोष

By admin | Published: July 5, 2017 06:44 AM2017-07-05T06:44:44+5:302017-07-05T06:44:44+5:30

विठ्ठलाच्या नामघोषात मंगळवारी संपूर्ण नवी मुंबई परिसर विठ्ठलमय झाला. शहरातील विठ्ठल मंदिरे सजविण्यात आली होती. ठिकठिकाणी

Vythurah's victory in the temples of the city | शहरातील मंदिरांत विठूरायाचा जयघोष

शहरातील मंदिरांत विठूरायाचा जयघोष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : विठ्ठलाच्या नामघोषात मंगळवारी संपूर्ण नवी मुंबई परिसर विठ्ठलमय झाला. शहरातील विठ्ठल मंदिरे सजविण्यात आली होती. ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
टाळ, मृदुंगाचा नाद, विठूनामाचा गजर करत शहरात ठिकठिकाणी अभंग, गवळण, हरिपाठ, भजन, समाजप्रबोधनपर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून विठूमाउलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरात अनेक तरुण स्वयंसेवक कार्यरत होते. नेरुळ, वाशी, सीबीडी-बेलापूर, घणसोली, ऐरोली, दिघा परिसरांतील मंदिरांना रोषणाई करण्यात आली होती, तसेच आतील परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. पहाटेपासून अभिषेक, कीर्तन, महाआरती अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. बेलापूर, करावे, दारावे, घणसोली, वाशी आदी परिसरांतून पंढरपूरपर्यंत पायी दिंडी काढण्यात आली होती.
नवी मुंबईतून परिसरातून हजारो भाविक पंढरपूरला दर्शनासाठी पोहोचले असून, त्यापैकी काही आळंदी ते पंढरपूर वारीतही सहभागी झाले होते. घणसोली येथील संत तुकाराम महाराज वारकरी मंडळाच्या वतीने गेली २७ वर्षे पायी दिंडी काढण्यात येत असून, यावर्षीच्या दिंडीत तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घरोंदा वसाहतीतील आदर्श सोसायटीतील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, पारंपरिक वेशात महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. तर बच्चेकंपनीने सादर केलेले लेझीम खेळ या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. या वेळी उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमोद साळुंखे, दत्तात्रेय कुंभार, अशोक भिलारे, अजय चव्हाण, सुनील नरलकर, रघुनाथ काठे, फ्रान्सिस डिसोजा, संदीप सावंत, शिवाजी पाटील, राजकुमार बिराजदार, हरिसिंग रावत, श्रीनिवास गरवारे, पांडुरंग पाटील डेरे आदी उपस्थित होते.

बाल वारकऱ्यांची दिंडी : बेलापूरमधील विद्याप्रसारक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखी पूजन, आरती करून बेलापूर परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठू माउलींचा जयघोष केला. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित व समाजहित जपण्याचा संदेश दिला. संतांचे कार्य विद्यार्थ्यांना कळावे याकरिता दिंडी काढण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी, सचिव कृष्णा कोळी, दीपक दिवेकर, मुख्याध्यापक एस. डी. सोनवणे, पर्यवेक्षक अनिल नेहते आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Vythurah's victory in the temples of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.