एनएमएमटीच्या ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:23 AM2020-01-11T00:23:00+5:302020-01-11T00:23:01+5:30
गैरहजर असलेल्या कामगारांचीही हजेरी लावून त्यांचा पगार काढला जात असल्याची बाब एनएमएमटीमध्ये उघडकीस आली होती.
नवी मुंबई : गैरहजर असलेल्या कामगारांचीही हजेरी लावून त्यांचा पगार काढला जात असल्याची बाब एनएमएमटीमध्ये उघडकीस आली होती. या प्रकरणी एका कर्मचाºयाला निलंबित करण्यात आले असून, अद्याप कोणत्याच अधिकाºयावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या बोगस हजेरी प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाईची मागणी होत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात कर्मचाऱ्यांची बोगस हजेरी लावून पगार काढला जात असल्याची बाब आॅक्टोबर २०१९ मध्ये उघड झाली होती. या प्रकरणी हजेरी नोंद करणाºया अनंत तांडेल या कर्मचाºयाला तत्काळ निलंबित करण्यात आले होते. तर हजेरी तपासणी करणाºया इतर एका कर्मचाºयालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणावरून एनएमएमटीमध्ये गैरहजर कामगारांच्या हजेरी लावून प्रशासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात असल्याचे समोर आले होते. तांडेल हा गेली अनेक वर्षांपासून कामगारांच्या हजेरीच्या नोंदी ठेवण्याचे काम करत होता. मात्र, नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यातील हजेरी तपासल्या असता, त्यामध्ये १५ कर्मचारी गैरहजर असतानाही त्यांची हजेरी लावण्यात आल्याचे आढळून आले. यामुळे या संपूर्ण प्रकरणात इतरही अधिकाºयांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्याचा उलगडा करण्यासाठी प्रशासनाने समितीही गठित केली होती; परंतु दोन महिने उलटूनही एकाही अधिकाºयावर कारवाई करण्यात आलेली नाही. अधिकाºयांच्या संगनमतानेच हा घोटाळा आजवर चालत आल्याची शंका वर्तवली जात आहे, त्यामुळेच हजेरी लावण्यापासून ते पगार काढण्यापर्यंत सर्वांच्याच नजरेतून बोगस हजेºयांकडे दुर्लक्ष होत होते. यामुळे मागील दोन वर्षातले कर्मचाºयांचे हजेरी पट व इतर दस्तावेज तपासले जात आहेत. त्यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा उघड होण्याचीही शक्यता आहे; परंतु कर्मचाºयावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्यात प्रशासन हात आखडता घेत असल्याचाही संशय वर्तवला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून एनएमएमटी तोट्यात चालवली जात आहे. अशातच कर्मचाºयांच्या बोगस हजेरी लावून तिजोरीवर हात मारला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाईचीही मागणी होत आहे.