रोपवेसाठी करावी लागतेय आठ तासांची प्रतीक्षा
By admin | Published: November 16, 2015 02:18 AM2015-11-16T02:18:07+5:302015-11-16T02:18:07+5:30
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असतानाच श्री छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड
महाड : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असतानाच श्री छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी देखील पर्यटकांची पसंती असल्याचे गेल्या चार पाच दिवसांपासून गडावर होणाऱ्या गर्दीवरून दिसून येत आहे. रायगडातील समुद्र किनारे अक्षरश: हाऊसफुल्ल असून जिल्ह्यात हॉटेल आणि लॉजिंगचा व्यवसाय चांगलाच तेजीत आहेत.महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर रायगडच्या दर्शनासाठी येत असून गडावर जाण्या-येण्यासाठी रोप वेला सात ते आठ तासांची प्रतीक्षा पर्यटकांना करावी लागत आहे.
आबालवृद्धांच्या सोईसाठी गडावर जाण्यायेण्यासाठी रोप वेची सुविधा असली तरी दररोज शेकडो पर्यटक हे चित्रदरवाजामार्गे पायऱ्यांनी पायी गडावर जात आहेत. गडावर पर्यटकांना राहण्याची गैरसोय होत असल्याने या पर्यटकांना महाड शहराच्या ठिकाणी रहावे लागत आहे. पायऱ्यांचा पथमार्ग अनेक ठिकाणी कोसळलेल्या अवस्थेत असल्याने गड चढताना अनेक पर्यटकांचे पाय घसरून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. तर कोसळलेल्या कठड्यांमुळे पर्यटकांना धोका निर्माण होत आहे. गडाची दुरवस्था तसेच गड परिसरात सुविधांचा अभाव यामुळे राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गडावर जाण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वा. वाजेपर्यंत रोप वे सुरू ठेवण्यात येतो. सध्या दररोज सहा ते सात हजार पर्यटक रायगड किल्ल्याला भेट देत असून पार्र्किं गची व्यवस्था नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. महामार्गापासून महाड ते रायगड किल्ल्यापर्यंतच्या २७ किमी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने
प्रवास करताना प्रवासी हैराण होत आहेत.(वार्ताहर)