वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांची तासन्तास प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:41 AM2017-07-21T03:41:30+5:302017-07-21T03:41:30+5:30

तीन लाख लोकसंख्येच्या खारघर शहरात महावितरणच्या वतीने केवळ एकच वीज बिल भरणा केंद्र उपलब्ध असल्याने सध्या या वीज बिल भरणा केंद्रावर ग्राहकांची मोठी

Waiting hours for customers to pay electricity bills | वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांची तासन्तास प्रतीक्षा

वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांची तासन्तास प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : तीन लाख लोकसंख्येच्या खारघर शहरात महावितरणच्या वतीने केवळ एकच वीज बिल भरणा केंद्र उपलब्ध असल्याने सध्या या वीज बिल भरणा केंद्रावर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. तासन्तास रांगेमध्ये उभे राहून वीज बिल भरावे लागत असल्याने महावितरणने शहरात विभागनिहाय वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्याच्या घडीला शहरात सेक्टर १२ येथील महावितरण कार्यालयात वीज बिल भरणा केंद्र सुरू आहे. हे ठिकाण शहराच्या एका बाजूला असल्याने ग्राहकांना या ठिकाणी पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
खारघर शहराची व्याप्ती मोठी आहे. सेक्टर ३५ सारखा परिसर शहराच्या दुसऱ्या टोकाला असल्याने या केंद्रावर पोहोचण्यास नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. शहरात यापूर्वी सिडको मध्यवर्ती कार्यालय सेक्टर-४ या ठिकाणी महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र अस्तित्वात होते. मात्र, त्याचे टेंडर संपुष्टात आल्याने ते वीज बिल भरणा केंद्र बंद झाले आहे. खारघर सेक्टर-१२मध्ये असलेल्या वीज बिल भरणा केंद्रावर सध्या एका खिडकीतून संपूर्ण खारघरचे वीज बिल भरण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी असलेली इलेक्ट्रॉनिक मशिनदेखील अधूनमधून बंद पडत असल्याने ग्राहकांची या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. भरपावसात ग्राहकांना रांगेत उभे राहून बिल भरावे लागत आहे.


शहरात सेक्टर-१२मधील महावितरण कार्यालयातील वीज बिल भरणा याव्यतिरिक्त आणखी पाच ठिकाणी पतपेढ्यांच्यामार्फत वीज बिल स्वीकारले जात आहे. शहरात महावितरणच्या वतीने सेक्टर ४, १९, ३५, १२ या ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
- व्ही. पी. बुधवंत,
अधिकारी महावितरण

Web Title: Waiting hours for customers to pay electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.