- नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयसीयूसह व्हेंटिलेटर्स युनिट्सचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. प्रमुख रुग्णालयांमध्ये प्रवेशासाठी ५० ते ६० रुग्ण प्रतीक्षा यादीमध्ये असल्याचे समोर आले आहे. शहरातील परिस्थिती भयावह असून, महानगरपालिकेने व खासगी रुग्णालयांनीही युद्धपातळीवर आयसीयूसह व्हेंटिलेटर्स युनिट्स उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने नवीन रुग्णालयांची उभारणी करण्याबरोबर खासगी रुग्णालयांनाही कोरोनावर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. सद्यस्थितीमध्ये प्राथमिक लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी नवी मुंबईमध्ये मुबलक बेड तयार करण्यात आले आहेत. बुधवारी शहरात आॅक्सिजनविरहित १,६६१ बेड उपलब्ध होते. आॅक्सिजनची सुविधा असलेले ९०७ बेड शहरात उपलब्ध आहेत, परंतु आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिट्सची कमतरता कायम आहे. सर्व प्रमुख रग्णालयांमधील बेड फुल असून, अनेक रुग्णालयांमध्ये प्रवेशासाठी वेटिंग लिस्ट लावण्यात आली आहे. वाशीमधील एका खासगी रुग्णालयामध्ये ६० रुग्ण प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. बेलापूरमधील एका रुग्णालयामध्ये ५० जणांची प्रतीक्षा यादी आहे. प्रमुख रुग्णालयांमध्ये एकही बेड उपलब्ध नाहीत. यामुळे श्रीमंतांनाही उपचारासाठी बेड मोकळे होण्याची वाट पाहावी लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रुग्णांना प्रतिदिन १० लीटरपेक्षा जास्त आॅक्सिजनची आवश्यकता भासू लागली की, त्या रुग्णांना आयसीयू व व्हेंटिलेटर्स असलेल्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जात आहे, परंतु कुठेच जागा उपलब्ध होत नसल्याने करायचे काय, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. महानगरपालिका आयुक्तांनी महानगरपालिका रुग्णालयात आयसीयू युनिट्स व व्हेंटिलेटर्र्सची संख्या वाढवावी. याशिवाय खासगी ेरुग्णालयांनाही युनिट्स वाढविण्याची परवागनी द्यावी. युद्धपातळीवर या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढेल, अशी भीती व्यक्त केलीजात आहे.व्हेंटिलेटर्र्स व आयसीयू युनिटची कमतरता निर्माण झाली आहे. रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिका व खासगी रुग्णालयांनी विनाविलंब आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिट वाढविणे आवश्यक आहे.- नामदेव भगत, माजी सिडको संचालकरुग्ण व त्यांचे नातेवाईक मदतीसाठी लोकप्रतिनिधींना फोन करत असतात. मंगळवारी सायंकाळी अनेक खासगी रुग्णालयात फोन केले असता, त्यांच्याकडे प्रवेशासाठी मोठी प्रतीक्षा यादी असल्याचे समोर आले आहे. व्हेंटिलेटर्स व आयसीयू युनिट्सची तातडीने गरज असून, याविषयी पालकमंत्र्यांशीही आम्ही चर्चा करणार आहोत.- विठ्ठल मोरे, जिल्हा प्रमुख शिवसेनाभाजपचे नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक आठवड्याला मनपा आयुक्तांची भेट घेत आहोत. प्रत्येक मीटिंगमध्ये आयसीयू युनिट्स व व्हेंटिलेटर्स वाढविण्याची मागणी करत आहोत. शहरातील स्थिती गंभीर असून, आयुक्तांनी तातडीने उपाययोजना कराव्या.- अनंत सुतार, माजी सभागृह नेतेबुधवारची रुग्णालयनिहाय उपलब्ध आयसीयू व व्हेंटिलेटर्सची स्थितीरुग्णालय आयसीयू व्हेंटिलेटर्समनपा वाशी रुग्णालय ० ०तेरणा नेरुळ ० ०फोर्टीस वाशी ० ०रिलायन्स कोपरखैरणे ० ०एमजीएम सीबीडी ५ ०एमपीसीटी सानपाडा १ ०अपोलो सीबीडी ० ०पीकेसी रुग्णालय ० ०न्यूरोजन नेरुळ ० ०इंद्रावती ऐरोली ० ०सनशाइन नेरुळ ३ ०डी. वाय. पाटील ० ०सिडको प्रदर्शन केंद्र ० ०हेरिटेज ऐरोली ० १न्यू मिलेनियम ० २न्यू मानक ३ ०लक्ष्मी घणसोली ० ०फ्रिझन घणसोली ० ०व्हिनस रुग्णालय ० ०निर्मल मल्टिस्पेशालिटी ० ०राजपाल कोपरखैरणे ० ०सिद्धिका कोपखैरणे ० २एमजीएम वाशी ० ०एमजीएम सानपाडा ० ०एपीएमसी निर्यातभवन ० ०राधास्वामी सत्संग भवन ० ०
नवी मुंबईमध्ये आयसीयूसह व्हेंटिलेटरसाठी प्रतीक्षा यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:55 PM