शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

शौचालयपाडण्यासाठी जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2016 4:16 AM

पोलादपूर तालुक्यांतील दिवील कुंभारवाडी येथील वाळीतग्रस्त प्रियंका देवे यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत स्वदेस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने बांधले

जयंत धुळप ,  अलिबागपोलादपूर तालुक्यांतील दिवील कुंभारवाडी येथील वाळीतग्रस्त प्रियंका देवे यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत स्वदेस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने बांधलेले व्यक्तिगत स्वच्छतागृह सामाजिक बहिष्कार असल्याने ते पाडून टाकण्याकरिता त्यांना पुन्हा जाच करण्यास प्रारंभ करण्यात आला. या जाचाला कंटाळून हे शौचालय पाडून टाकल्यावर आपल्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कार मागे घेण्यात येईल, या अपेक्षेने देवे कुटुंबाने नव्यानेच बांधलेले हे शौचालय अखेर पाडून टाकले. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वच्छता अभियानास देखील आता सामाजिक बहिष्काराचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले आहे.पोलादपूर तालुक्यातील दिवील कुंभारवाडी येथील रहिवासी असणाऱ्या प्रियंका देवे यांच्या पुतण्याने केलेल्या विवाहास गावकीने आक्षेप घेतला. त्याच मुद्द्यावरून देवे कुटुंबास गावातील काही राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरून वाळीत टाकून सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत केले आहे. गुन्हा दाखल झालेले २३ जणांना जामिनावर सोडण्यात आले. जामिनावर सुटून आल्यानंतर त्यांनी आम्हाला सातत्याने विविध कारणांनी जाच करण्यास सुरुवात केली असल्याचे प्रियंका देवे यांनी सांगितले. आमच्या घरासमोर पिढ्यान्पिढ्याच्या वहिवाटीच्या जागेत दोन शौचालये बांधली. यामुळे माझे पती प्रकाश देवे यांची रिक्षा घरापर्यंत येऊ शकत नाही. या संदर्भात सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनी स्वदेस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने बांधलेले शौचालय तोडण्याची अट घातली. शौचालयाचे बांधकाम आम्ही तोडले. मात्र तरीही आमची अडवणूक करण्याच्या हेतूने त्यांनी बांधलेले शौचालय तोडले नसल्याचे प्रियंका देवे यांनी सांगितले.