इमारत दुर्घटनेनंतर जाग, पाच इमारतींचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 01:06 PM2023-08-25T13:06:03+5:302023-08-25T13:06:13+5:30

नेरूळ सेक्टर ६ मधील तिसऱ्या मजल्यावर दुरूस्तीचे काम करत असताना दुर्घटना घडली

Wake up after building disaster, immediate structural audit of five buildings | इमारत दुर्घटनेनंतर जाग, पाच इमारतींचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट

इमारत दुर्घटनेनंतर जाग, पाच इमारतींचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नेरुळ येथे दुर्घटना घडल्यानंतर पालिका प्रसासनाला जाग आली आहे. संपूर्ण तुलसी भवन इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात केली असून रहिवाशांची दर्शन दरबार आश्रमामध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. नेरूळ सेक्टर ६ मधील तुलसी भवन इमारतीमध्ये तीन मजल्यांचे स्लॅब कोसळून दोन ठार आणि दोन जण गंभीर जखमी झाले. तिसऱ्या मजल्यावर दुरूस्तीचे काम करत असताना ही घटना घडली. दुर्घटनेमध्ये पहिल्या मजल्यावर राहणारे बाबाजी आनंद शिंगाडे (५५), कामगार रामलू नायक (५७) यांचे निधन झाले. शोभा शिंगाडे ( ५०) व अजिजूल शेख (४८) हे दोन जण जखमी झाले आहेत. अजिजूल हा कामगारही फरशी काढण्याचे  काम करत होता. पण त्याच्या हाताला स्लॅबचे लोखंड आल्यामुळे तो खाली कोसळला नाही. जखमींवर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी तत्काळ घटनास्थळी  पोहोचून मदतकार्य सरू केले. तुलसी नावाच्या दोन सोसायट्या असून त्यामध्ये पाच इमारती आहेत. पालिकेने सकाळी सर्व इमारतींचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट सुरू केले. दिवसभर इतर पाच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम सुरू होते. हा अहवाल आल्यानंतर इतर सदनिका राहण्यायोग्य आहेत का हे निश्चित केले जाणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केली आहे.

ठेकेदारासह कंत्राटदारावर गुन्हा?

  • तुळशी भवन इमारतीमध्ये घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी विकसक, ठेकेदार व घरमालक यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. याप्रकरणी नेरूळ पोलिसांकडून प्रक्रिया सुरू असून कागदपत्रे तपासली जात आहेत.
  • तिसऱ्या मजल्यावर लाद्या बसवण्याचे काम असताना स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जीर्ण इमारतीमध्ये काम करताना दुर्घटना घडल्याने ज्या घरामध्ये काम सुरू होते. पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे.
  • मात्र, सोसायटीचे अध्यक्षच दुर्घटनेत मृत झाल्याने कागदपत्र पडताळणीला विलंब होत असल्याने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


नेरूळमध्ये दुरूस्तीचे काम सुरू असताना स्लॅब कोसळला. गतवर्षीही नेरूळ पूर्वला अशी घटना घडली होती. याविषयी तत्काळ आयआयटी व व्हिजेटीआयच्या तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. यापुढे दुरूस्तीचे काम करताना काय काळजी घ्यावी याविषयी नियमावली तयार केली जाईल.
-राजेश नार्वेकर, आयुक्त महानगरपालिका

Web Title: Wake up after building disaster, immediate structural audit of five buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.