धनगर समाजाचा अनूसुचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी पदयात्रा  

By वैभव गायकर | Published: December 17, 2023 04:04 PM2023-12-17T16:04:38+5:302023-12-17T16:06:38+5:30

धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा व समाजाला आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे.

Walk for inclusion of Dhangar community in Scheduled Tribes | धनगर समाजाचा अनूसुचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी पदयात्रा  

धनगर समाजाचा अनूसुचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी पदयात्रा  

पनवेल: धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा व समाजाला आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी रविवार दि.17 रोजी कळंबोली ते पनवेल अशी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी  नवी मुंबईमधील हजारो धनगर बांधव पदयात्रेत सहभागी झाले होते. 

मागील 50 वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत आहे, तो लढा देत असताना वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले. मात्र या लढ्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सरकार बरोबर सनदशीर पद्धतीने चर्चा करूनच मार्ग काढावा लागेल, असे सांगत जर सरकारने धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर लोकशाहीने दिलेल्या सर्वात मोठा अधिकार मतदानाच्या माध्यमातून धनगर समाज नक्कीच येत्या निवडणुकीत शासनकर्त्याना त्यांची जागा दाखवेल, असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते तुकाराम सरक यांनी केले. 

धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा व समाजाला आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचं आंदोलन सुरू असून कळंबोली व कामोठा शहरात धनगर समाजाच्यावतीने "उठ धनगरा जागा हो आरक्षणाचा धागा हो" एक दिवस समाजासाठी "यळकोट यळकोट... जय मल्हार" च्या घोषणांनी शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. 

मोर्चामध्ये पिवळ्या टोप्या व पिवळे झेंडे हातामध्ये घेऊन धनगरसमाज बांधव रस्त्यावर उतरले होते. हनुमान मंदिर, कारमेल स्कूल, करावली चौक, सायन पनवेल महामार्ग ते कामोठा स्टॉप कामोठा मायाक्का मंदिर अशी पदयात्रा निघाली मायाक्का मंदीर येथे पोचल्यानंतर पदयात्रेचे  रूपांतर सभेत झाले.

Web Title: Walk for inclusion of Dhangar community in Scheduled Tribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.