शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

पनवेल महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाच्या भिंतीला पाझर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 2:31 AM

पनवेल महानगरपालिकेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गळती लागली आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गळती लागली आहे. या दुमजली इमारतीत पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग ‘ड’ प्रभाग समितीच्या कार्यालयासह एलबीटी तसेच टपाल कार्यालय आहे. इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. भिंतीतून पाणी पाझरत असल्याने त्याचा फटका येथील कामकाजाला बसला आहे.शहरातील अतिमहत्त्वाच्या कार्यालयापैकी हे व्यापारी संकुल आहे. नागरिकांची सततची वर्दळ या ठिकाणी असते. विशेष म्हणजे, प्रभाग अधिकाऱ्यांचे दालन असलेल्या भिंतीही पूर्णपणे ओल्याचिंब झाल्याने पालिकेचे या इमारतीकडे दुर्लक्ष झाले आहे. पनवेल शहरातील पोस्ट आॅफिस नवीन पनवेलला स्थलांतरित करण्यात आले होते. मागील वर्षभरापासून पोस्ट कार्यालय पनवेल शहरात स्थलांतर करण्याची मागणी केली जात होती. कफ सारख्या संघटनापासून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी हे कार्यालय शहरात स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न केले. आमदारापासून खासदारांनी याकरिता पोस्ट कार्यालयात बैठका घेतल्या. त्यानुसार दोन ते तीन महिन्यांपासून हे कार्यालय स्वर्गीय विलासराव देशमुख व्यापारी संकुलातील दोन गाळ्यात स्थलांतरित झाले. गाळा क्र मांक ११० आणि १११ या दोन गाळ्यांमध्ये पोस्टाचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र, इमारतीला लागलेल्या गळतीमुळे या ठिकाणी काम करताना अडथळा निर्माण होत आहे. भिंतीतून पाणी झिरपत असल्याने शॉर्टसर्किटची भीती निर्माण झाली आहे. पोस्ट कार्यालयासह संकुलातील इतर गाळेधारकांकडून महापालिका दरमहा भाडे वसूल करते. त्यामुळे येथील समस्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारीही महापालिकेची असल्याचे येथील गाळेधारकांचे म्हणणे आहे. या इमारतीत बँक, दुकाने, तसेच पोस्ट कार्यालयामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. विशेष म्हणजे, या इमारतीच्या जिन्यावर सर्व गाळ्यांना वीजपुरवठा करणारी विद्युत यंत्रणा कार्यान्वित आहे. अशा परिस्थितीत भिंतीच्या माध्यमातून शॉर्ट सर्किट झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.संबंधित व्यापारी संकुलात अनेक ठिकाणच्या भिंती ओलसर झाल्या आहेत. पालिकेच्या अभियंत्यांमार्फत या ठिकाणच्या कामाची पाहणीही करण्यात आली असून लवकरच गळती थांबविण्याचे काम सुरू होणार आहे.- श्रीराम हजारे,अधिकारी, प्रभाग ‘ड’ समिती, पनवेल महानगरपालिकाया कार्यालयांचा समावेशस्वर्गीय विलासराव देशमुख व्यापारी संकुलात प्रभाग कार्यालयासह पोस्ट आॅफिस, एलबीटी कार्यालय, बाकी दुकानांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शहरातील पोस्ट आॅफिस या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला होता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल