शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
2
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
3
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
4
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
7
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
8
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...
9
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
10
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
11
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
12
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
13
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
14
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
15
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
16
Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत
18
भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...
19
Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!
20
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

वंडर्स पार्कचे विदु्रपीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2016 2:57 AM

महापालिकेने वंडर्स पार्क लग्नसोहळ्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याने उद्यानाला लग्नाच्या हॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लग्न, इतर कार्यक्रमांसाठी जेवणाची आॅर्डर फूड

नवी मुंबई : महापालिकेने वंडर्स पार्क लग्नसोहळ्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याने उद्यानाला लग्नाच्या हॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लग्न, इतर कार्यक्रमांसाठी जेवणाची आॅर्डर फूड कोर्ट चालकालाच देण्याची सक्ती करण्यात आली आहे. उद्यानात येणाऱ्यांकडून खाद्यपदार्थांचे जादा पैसे उकळणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन त्याचीच पाठराखण करीत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. नेरूळ सेक्टर १९ मधील महापालिकेच्या वंडर्स पार्कमधील फूडकोर्ट चालकाच्या मनमानीविषयी वृत्त प्रसिद्ध करताच ठेकेदारांना पाठीशी घालणारांचे धाबेही दणाणले आहे. नागरिकांनी मात्र या वृत्ताचे स्वागत केले असून, येथील गैरसोयीविषयी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. रोज सकाळी शेकडो नागरिक मॉर्निंग वॉकसाठी उद्यानामध्ये जातात. प्रदूषणविरहित जॉगिंग ट्रॅक असल्याने अनेक सरकारी अधिकारी, नगरसेवकही सकाळी या ठिकाणी येत असतात. लग्नसोहळ्याच्या दोन दिवस अगोदर मंडप उभारण्यास सुरुवात होती. सोहळा झाल्यानंतर पुढील दोन दिवस सर्व साहित्य येथील लॉनवर पडलेले असते. तलाव व इतर ठिकाणीही कचऱ्याचे ढीग दिसतात. शिल्लक राहिलेले खाद्यपदार्थ अनेक ठिकाणी पडलेले असतात. सकाळी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीला सामोरे जावे लागते. पोलीस व महापालिकेच्याही अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी याची छायाचित्रे काढली असून, ती आज ‘लोकमत’कडे पाठविली आहेत. शहरातील लँडमार्क असणाऱ्या या उद्यानाचे विद्रुपीकरण थांबवा, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केली आहे. वंडर्स पार्कमधील लॉन लग्न, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. परंतु या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना जेवण व इतर खाद्यपदार्थांची आॅर्डर फूडकोर्ट चालकालाच दिली जाईल, अशाप्रकारची कोणतीही तरतूद केलेली नव्हती. शीतपेय व इतर वस्तंूवरील छापील किमतीपेक्षा १० ते १५ रुपये जास्त घेण्याची परवानगीही महापालिकेने दिलेली नाही. फूडकोर्टमध्ये खाद्यपदार्थ घेणाऱ्या नागरिकांना मागितले तरच बिल दिले जाते. या बिलावर व्हॅट व इतर टॅक्सचा कोणताही उल्लेख नसतो. या सर्व गोष्टींकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ठेकेदाराने येथे किचन शेड व फूडकोर्ट बनविण्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. वास्तविक येथे व्यवसाय होत नसल्याने त्यांनाही परवडत नाही. इतर शहरापेक्षा उद्यानामधील खाद्यपदार्थांचे दर कमीच असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी जास्त पैसे मोजले तरी हरकत नाही, परंतु ठेकेदाराचे हित जोपासले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली जात असल्याने त्याविषयी नाराजी वाढू लागली आहे. दरपत्रकाची झाडाझडती सुरू ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन शहरातील काही महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींनी वंडर्स पार्कमध्ये जाऊन तेथील मेनू कार्डची पाहणी केली. दरपत्रक खरोखर जास्त आहे का याची माहिती घेण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाचेही धाबे दणाणले आहे. शिवसेना नगरसेवक स्थायी समिती व सर्वसाधारण सभेतही याविषयी आवाज उठविणार असून, त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.