युतीच्या मुलुंडमधील बालेकिल्ल्यात अंतर्गत युद्ध...

By नेहा सराफ | Published: March 19, 2019 05:40 AM2019-03-19T05:40:39+5:302019-03-19T05:41:26+5:30

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उठसूट नेत्यांवर आरोपांची राळ उडविणाऱ्या सोमय्यांना आता आपल्याच वक्तव्यांची झळ सोसावी लागत आहे. मुलुंडमध्ये भ्रष्टाचाररूपी रावण दहनानंतर सोमय्या विरुद्ध शिवसेना असे चित्र मुलुंडमध्ये कायम आहे.

 The war in the citadel of Mulund ... | युतीच्या मुलुंडमधील बालेकिल्ल्यात अंतर्गत युद्ध...

युतीच्या मुलुंडमधील बालेकिल्ल्यात अंतर्गत युद्ध...

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे
 
- मुलुंड विधानसभा मतदार संघ 

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उठसूट नेत्यांवर आरोपांची राळ उडविणाऱ्या सोमय्यांना आता आपल्याच वक्तव्यांची झळ सोसावी लागत आहे. मुलुंडमध्ये भ्रष्टाचाररूपी रावण दहनानंतर सोमय्या विरुद्ध शिवसेना असे चित्र मुलुंडमध्ये कायम आहे. मुलुंडमधील शिवसेनेने पाठिंबा न देण्याची भूमिका उघडपणे घेतली असताना बालेकिल्ल्यात पक्षांतर्गत युद्ध सुरू आहे.
उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचे विधानसभा क्षेत्र म्हणून मुलुंडकडे पाहिले जाते. मुंबईचे पूर्वेचे प्रवेशद्वार म्हणजे मुलुंड. पूर्वेकडील नवघर, मिठागर, गव्हाणपाडा, निर्मलनगरपासून पश्चिमेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मुलुंड कॉलनीपर्यंत मुलुंड विस्तारले आहे.
उच्चभ्रू, मध्यम आणि गरीब अशी संमिश्र वस्ती या मतदारसंघामध्ये दिसून येते. गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय अशी चेहरेपट्टी मुलुंडला आहे. मुलुंडमध्ये या वर्षी मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली आहे. मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार १० सप्टेंबर २०१८ रोजीपर्यंत दोन लाख ७२ हजार ८७८ इतकी मतदार नोंदणी झाली होती, तर ३१ जानेवारी २०१९ रोजीपर्यंत झालेल्या मतदार नोंदीनुसार २ लाख ७७ हजार ३८ इतकी मतदार नोंदणी करण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुलुंडमध्ये ४१६० मतदार वाढले आहेत.

Web Title:  The war in the citadel of Mulund ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.