पनवेल : पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. या वेळी भाजपचे शत्रुघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत आणि तेजस कांडपिळे हे बिनविरोध निवडून आले.महापालिकेमधील सभागृहात आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता प्रभागवार निवडणूक घेण्यात आली. या वेळी विरोधी पक्षाकडून एकही अर्ज दाखल न केल्याने सत्ताधारी भाजपचे प्रभाग ‘अ’ मधून शत्रुघ्न अंबाजी काकडे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. प्रभाग ‘ब’मध्ये संजय दिनकर भोपी, प्रभाग ‘क’मध्ये गोपीनाथ दिनकर भगत आणि प्रभाग ‘ड’मध्ये तेजस जनार्दन कांडपिळे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभापती दर्शना भोईर, विद्या गायकवाड, मनोज भुजबळयांच्यासह अनेक नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.
पनवेलमध्ये प्रभाग समिती सभापतींची निवड बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 2:01 AM