पनवेल : पनवेल महानगरपालिकेची प्रभाग रचनेची सोडत २७ डिसेंबर रोजी मंगळवार पार पडणार आहे. बुधवारी २१ डिसेंबर रोजी उशिरा महापालिकेला नवा कार्यक्र म जाहीर केला आहे. आॅक्टोबर महिन्यात पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यापासून निवडणुकीसंदर्भात उत्सुकता लागून राहिली आहे. प्रारंभी आरक्षणाच्या माध्यमातून या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरूवात होणार असल्याने आगामी काळात शहरातील वातावरणात ढवळून निघणार आहे. महापालिकेने प्रभाग आरक्षणासंदर्भातील प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. राजकीय वर्तुळात अनेक राजकीय पक्षांनी व इच्छुक कार्यकर्त्यांनी यांनी आपापल्या सोयीनुसार या प्रभाग रचनेची आखणी केली होती. १ डिसेंबरपासून या प्रभाग रचनेच्या कार्यक्र माला सुरुवात झाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आरक्षण सोडत होणार आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा ३0 डिसेंबरला प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर ३0 डिसेंबर ते १३ जानेवारी २0१७ या कालावधीत सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
मंगळवारी महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत
By admin | Published: December 23, 2016 3:32 AM