एपीएमसी फळ मार्केटसमोर कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 02:31 AM2018-07-19T02:31:16+5:302018-07-19T02:31:20+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटसमोर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

Waste Empire before the APMC Fruit Market | एपीएमसी फळ मार्केटसमोर कचऱ्याचे साम्राज्य

एपीएमसी फळ मार्केटसमोर कचऱ्याचे साम्राज्य

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटसमोर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एपीएमसी परिसरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने व्यापाºयांसह कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यापासून अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एपीएमसी वाहतूक पोलीस चौकीपासून माथाडीभवनकडे जाणाºया रोडवरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. फळ मार्केटच्या समोरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचºयामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे.द फ्रूट अँड मर्चंट असोसिएशनने याविषयी तुर्भे विभाग कार्यालयाकडे २० पेक्षा जास्त वेळा पत्रव्यवहार केला आहे. येथील फेरीवाले हटविण्यात यावेत. सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त केला जावा अशी मागणी केली आहे. परंतु तुर्भे विभाग कार्यालयाला हा परिसर फेरीवालामुक्त करण्यात यश आलेले नाही. विभाग कार्यालयातील कर्मचाºयांच्या निष्काळजीपणामुळेच या परिसरातील अतिक्रमण वाढत असल्याचा आरोप होवू लागला आहे.
कचºयामुळे बाजार समिती परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रोगराई पसरल्यानंतर महापालिका कारवाई करणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही केली जात आहे.
>फळ मार्केटच्या समोर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मोठ्याप्रमाणात कचरा याठिकाणी टाकला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.
- संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी
>मुुंढे बरे होते
महापालिका आयुक्तपदावर तुकाराम मुुंढे असताना फळ मार्केटसमोरील अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली होती. ते नवी मुंबईमध्ये असेपर्यंत पोलीस चौकी ते माथाडीभवन परिसर अतिक्रमणमुक्त झाला होता. त्यांच्या बदलीनंतर फेरीवाल्यांवर वचक राहिला नसून मुंढे बरे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Web Title: Waste Empire before the APMC Fruit Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.