नवी मुंबई : महापे येथील एमआयडीसी मुख्यालयाच्या समोर कर्मचारी वसाहतीला समस्यांचा विळखा पडला आहे. कचºयाचे साम्राज्य पसरले असून येथे राहणाºया कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एमआयडीसी मुख्यालयासमोर जुने कार्यालयाची इमारत व कर्मचारी वसाहत आहे. मुख्यालय नवीन इमारतीमध्ये हलविल्यानंतर याठिकाणी अतिक्रमण मोहिमेमध्ये जप्त केलेले साहित्य, एमआयडीसी प्रशासनाकडील जुनी वाहने व इतर साहित्य ठेवले जात आहे. पाणीपुरवठा विभागाचे पाइप व इतर साहित्यही याच भूखंडावर ठेवण्यात आले आहे.
याठिकाणी कर्मचारी वसाहत असून ३० ते ३५ नागरिक वास्तव्य करत आहेत. वसाहतीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. कचºयाचे ढिगारे निर्माण झाले आहेत. भंगार साहित्य ठेवल्यामुळे त्यामध्ये पाणी साचले आहे. कचरा व साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.डासांमुळे सायंकाळी इमारतीच्या बाहेर उभे राहणेही शक्य होत नाही. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वसाहतीमधील समस्यांविषयी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे, परंतु कोणीही याकडे लक्ष देत नाही. कर्मचारी वसाहतीच्या परिसरातील कचरा रोज उचलला जात नाही. कचरा ठेवण्यासाठी कचरा कुंड्या देण्यात आलेल्या नाहीत. मोकळ्या जागेवरच कचरा टाकला जात असून त्यामुळे दुर्गंधी वाढत आहे. किमान कचरा ठेवण्यासाठी कचरा कुंंड्या उपलब्ध करून दिल्या जाव्यात व नियमित कचरा उचलला जावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. अनावश्यक भंगार साहित्य येथून हटविण्यात यावे व नियमित साफसफाई करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.दखल कधी घेणार?कर्मचारी वसाहतीमधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांमुळे डेंग्यू व मलेरियाची साथ पसरण्याची भीती आहे. अशीच स्थिती राहिली तर साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनाने साफसफाईची कामे करावी व कचरा कुंड्या त्वरित उपलब्ध करून द्याव्या अशी अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.