नवी मुंबई : मैदानातील जागेत गर्दुल्ल्यांचा वावर, ठिकठिकाणी दगड आणि मातीचा खच पडल्याने मैदानाची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे लहान मुलांपासून खेळाडूंपर्यंत सर्वांची परवड होत आहे. सीबीडी सेक्टर ८बी परिसरातील वीर जवान क्र ीडांगणाची ही अवस्था! एकीकडे शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे तर दुसरीकडे मात्र त्याच परिसरातील मैदानांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. मैदानाच्या सुशोभीकरणाबाबत महानगरपालिकेकडे वारंवार विनंती केल्यानंतरही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.या मैदानात वर्षातून ३ ते ४ वेळा क्रि केटचे सामने भरवले जात असल्याने नवी मुंबई परिसरातून खेळाडू खेळण्यासाठी येतात. सामने भरविण्यापूर्वीच तेवढी या मैदानाची स्वच्छता केली जात असून इतर वेळी मात्र ही जागा वापरण्याजोगी राहत नाही. मैदानाच्या सुरक्षेसाठी असलेल्या संरक्षक भिंतीलाही तडे जात असल्याची तक्र ार नागरिकांकडून होत आहे. स्थानिक तरु ण या मैदानात क्रि केट, फुटबॉल खेळतात. या मैदानात मोठ्या प्रमाणात लाल मातीची आवश्यकता आहे. येथील गवताची उंची वाढल्याने दिवसेंदिवस डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अस्वच्छतेमुळे या मैदानातील जागेचा वापरही केला जात नाही. मातीतील बारीक दगड, वाळूमुळे खेळाडूंना शारीरिक इजा होत असल्याचे खेळाडू सांगतात. मागील काही वर्षांपासून मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याबाबत क्र ीडा संघटना आणि नागरिकांनी पालिकेकडे तक्र ारी केल्यानंतरही प्रशासन लक्ष देत नसल्याचे नागरिक व खेळाडूंचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)मैदानाच्या दुरवस्थेबाबत आपण वारंवार पालिकेत आवाज उठविला असून, सुशोभीकरणाची मागणी लावून धरली होती. अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले असून ठेकेदार अर्धवट काम सोडून गेल्याने याठिकाणी बांधकाम साहित्य उचलण्यात आलेले नाही, अशी माहिती येथील नगरसेविका सुरेखा नरबागे यांनी दिली.
सीबीडीतील क्रीडांगणाच्या जागेवर कचऱ्याचा ढीग
By admin | Published: September 28, 2016 4:25 AM