शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

नियोजनाअभावी कोट्यवधी वाया,जलवाहिनीसाठी काँक्रिटच्या रस्त्याचे पुन्हा खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 2:49 AM

पनवेल शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.

पनवेल : पनवेल शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र शहरात अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामासाठी रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणासाठी खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याने स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.पनवेल शहरात उरण नाका रोडवर शनिवारी खोदकाम करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय असलेल्या या रस्त्याचे अवघ्या काही महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यावर शनिवारपासून खोदकामास सुरुवात करण्यातआली.पनवेल महपालिकेकडून स्वच्छ, सुंदर शहरासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यात स्वच्छ शहराबरोबरच सुशोभीकरणावरही भर दिला जात आहे. शहरातील भिंती रंगविण्यात आल्या आहेत. मात्र स्मार्ट सिटी म्हणून शहराचा विकास करताना नियोजनातील त्रुटीमुळे कधी केबल टाकण्यासाठी तर कधी जलवाहिनी, भूमिगत वीजवाहिन्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर खोदकाम केले जात आहे.>रस्ते बांधण्यापूर्वीपरिसरातील जलवाहिनी, वीजवाहिन्यांबाबत योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. मात्र नियोजनात त्रुटी राहिल्याने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या रस्त्यांवर खोदकाम होताना दिसत आहे. यासंदर्भात पनवेल महालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांच्याकडे विचारणा केली असता, सध्या परिसरातील खोदकाम थांबविल्याचे त्यांनी सांगितले.>खारघर-तळोजा रस्त्याची दुरवस्थाखारघर शहरातून तळोजा गावात जाणाºया रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे फारूक पटेल यांनी सिडकोचे खारघर विभागाचे प्रशासक सीताराम रोकडे यांना निवेदन देऊन लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची विनंती केली आहे.खारघर शहर स्मार्ट सिटी करण्याचा सिडकोचा मानस आहे. मात्र शहरालगत असलेली गावे, वाड्या अद्याप मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. तळोजा गावाकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाल्याने ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच अंदाज न आल्याने वाहनांच्या अपघाताचाही धोका वाढल्याचे चालकांचे म्हणणे आहे. या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी न केल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा या वेळी पटेल यांनी दिला आहे.