शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पावसाळी नाल्यांमध्ये सांडपाणी

By admin | Published: March 27, 2016 2:35 AM

नवीन पनवेल नोडकरिता स्वतंत्र मलनिस्सारण केंद्र नसल्याने सांडपाणी पावसाळी नाल्यांमध्ये सोडण्यात येत आहे. त्याच त्रास नवीन पनवेलकरांपेक्षा कामोठेतील रहिवाशांना सर्वाधिक होत आहे.

कळंबोली : नवीन पनवेल नोडकरिता स्वतंत्र मलनिस्सारण केंद्र नसल्याने सांडपाणी पावसाळी नाल्यांमध्ये सोडण्यात येत आहे. त्याच त्रास नवीन पनवेलकरांपेक्षा कामोठेतील रहिवाशांना सर्वाधिक होत आहे. यामुळे दुर्गंधी येत आहे, त्याचबरोबर स्थानिक रहिवासांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडूनही कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे भारत स्वच्छ अभियानाचाही बोजवारा उडाला आहे. नवीन पनवेलला १९ आणि खांदा वसाहतीत १४ सेक्टर असे एकूण ३३ सेक्टर या नोडमध्ये आहेत. एकूण ४० एमएलडी पाण्याची आवश्यकता नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत आहे. घनकचरा व्यवस्थापन शास्त्रशुध्द पध्दतीने होत नाहीच, त्याचबरोबर सांडपाण्यावर सुध्दा प्रक्रिया होत नसल्याचे सत्य उजेडात आले आहे.नवीन पनवेल वसाहतीचे डिझायन करताना या ठिकाणी मलनिस्सारण केंद्राचे नियोजन करण्यात आले नाही. नवीन पनवेलमध्ये दोन आणि खांदा वसाहत एक असे तीन पंपहाऊस आहेत. खांदेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या पंपहाऊसमध्ये नवीन पनवेल सुध्दा मलमिश्रित आणि सांडपाणी येते. हे पाणी बाजूला असलेल्या पावसाळी नाल्यात सोडले जाते. सेक्टर ७ ते कामोठे खाडी यादरम्यान हा पावसाळी नाला केवळ पावसाचे पाणी वाहून नेण्याकरिता काढण्यात आला आहे. परंतु त्यामध्ये मलमिश्रित पाणी सोडले जात आहे. खांदेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या पंपहाऊसमधून पाइप त्याचबरोबर एक नाल काढून त्यातून हे पाणी थेट नाल्यात सोडले जात आहे. त्यामुळे कामोठे वसाहतीतील नाल्यालगत राहणाऱ्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे, त्याचबरोबर डासांचा प्रार्दुभावही मोठ्या प्रमाणात होत आहे. सेक्टर २४ मधील श्री अपार्टमेंट, बालगणेश, लॅटवेणू, व्दारका सदन, सेक्टर २१ येथील पटेल पार्क, गणेशा सागर, साईराज, शुभम हाइट्स या इमारतीत राहणारे रहिवासी दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत. विस्टा कॉर्नर परिसरातील रिद्धेश्वर, साईदर्शन या सोसायटीतील रहिवासी सुध्दा त्रस्त आहेत. बाजूला शिव पॅराडाइज ही इमारत असून, येथे पोतदार जम्बो किड्स ही पूर्व प्राथमिक शाळा आहे. या प्ले स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. चॅनेलच्या बाजूला सेक्टर ३१ मध्ये बालाजी हाइट्स आणि साईप्रसाद हे टॉवर असून प्रक्रिया न केलेले सांडपाणी चॅनेलमधून वाहत असल्याने त्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. सेक्टर १८मध्ये परिस्थिती फारशी वेगळी नाही, येथील रहिवासी सुध्दा त्रस्त आहेत.नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीकरिता स्वतंत्र मलनिस्सारण केंद्र असणे क्र मप्राप्त आहे. कामोठे येथे हा प्रकल्प उभारला असला तरी त्याचा फायदा नवीन पनवेलला कितपत होईल, याबाबत शंका आहे. सिडको बिनधास्तपणे पावसाळी चॅनेलमध्ये पाणी सोडून देते. त्यामुळे कामोठेकरांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, ही आमची मागणी आहे.-दीपक निकम, पनवेल विधानसभा संघटक, शिवसेना.सिडकोने खारघर, कामोठे, कळंबोलीबरोबरच नवीन पनवेलला स्मार्ट सिटी करण्याची घोषणा केली आहे. मात्र कळंबोली समुद्रसपाटीपासून साडेतीन मीटर खाली आहे, त्याचबरोबर अनेक सुविधांपासून वंचित आहे. त्याचबरोबर नवीन पनवेलचीही स्थिती आहे. विशेषकरून या वसाहतीत एसटीपी प्रकल्प नाही. त्यामुळे पावसाळी नाला आणि गाढी नदीत मलमिश्रित आणि सांडपाणी सोडले जात आहे. - गोपीनाथ भगत, ग्रामपंचायत सदस्य, कामोठे.नवीन पनवेलला मलनिस्सारण केंद्र नाही ही गोष्ट खरी आहे. मात्र कामोठे येथे 80 एमएलडी क्षमतेचे केंद्र उभारण्यात आले आहे. येथे नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीतील पाणी प्रक्रिया करण्याकरिता पंपिंग करून पाठवले जाते. त्यामुळे फारशी अडचण येत असेल असे वाटत नाही.- सुधाकर विसाळे, अधीक्षक अभियंता, नवीन पनवेल, सिडको.