शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

चोरट्यांची नजर कारमधील लॅपटॉपवर

By admin | Published: January 19, 2016 2:25 AM

सोनसाखळी, वाहनचोरीनंतर शहरात आता लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. गतवर्षी १११ गुन्हे घडले असून फक्त ७ गुन्ह्यांचाच उलगडा झाला आहे.

नामदेव मोरे , नवी मुंबईसोनसाखळी, वाहनचोरीनंतर शहरात आता लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. गतवर्षी १११ गुन्हे घडले असून फक्त ७ गुन्ह्यांचाच उलगडा झाला आहे. लॅपटॉपची विक्री करणे सोपे असते व सापडण्याची शक्यता कमी असल्याने चोरट्यांनी हा सुरक्षित पर्याय शोधला आहे. नवी मुंबई व दक्षिण नवी मुंबईची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. शहराच्या विकासाबरोबर येथील गुन्हेगारीचे स्वरूपही बदलू लागले आहे. दरोडा, घरफोडीपेक्षा फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. पोलीस तपासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेवू लागले आहेत. यामुळे अनेक गुन्ह्यांचा पटकन उलगडा होत असतो. यामुळे चोरट्यांनीही सुरक्षित मार्ग हाताळण्यास सुरवात केली आहे. मागील काही वर्षांमध्ये शहरात लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. चोरटे रोड, बँक, मॉल, हॉटेलबाहेरील कारची रेकी करत फिरत असतात. कारमध्ये लॅपटॉप दिसला की काच फोडून तेथून पळ काढला जातो. दोन मिनिटात चोरी करून पसार होता येते. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यामध्ये दागिने विकतानाही पकडले जाण्याची भीती असते. शिवाय ज्वेलर्सवाले कमी दराने दागिने घेतात. यापेक्षा चोरीच्या लॅपटॉपची विक्री करणे अत्यंत सोपे असते. १० हजारपासून ५० हजार रुपये किमतीलाही लॅपटॉप विकले जातात. मोबाइलप्रमाणे लॅपटॉपमध्ये चोरांना पकडण्यासाठीची यंत्रणा नसते. याचाच गैरफायदा चोरटे घेवू लागले आहेत. लॅपटॉप चोरीच्या घटना वाढू लागल्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी या घटनांची स्वतंत्र नोंद करण्यास सुरवात केली आहे. २०१२ मध्ये १४७ लॅपटॉपची चोरी झाली होती. यामधील फक्त १५ गुन्ह्यांचाच तपास लागला होता. उघडकीस येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण फक्त १० टक्के होते. २०१४ मध्ये १३२ गुन्हे घडले होते. यामधील २० गुन्ह्यांचा तपास लागला असून गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण १५ टक्के होते. २०१५ मध्ये १११ घटना घडून फक्त ७ गुन्ह्यांचा तपास लागला आहे. गुन्हे प्रकटीकरणाची टक्केवारी फक्त ६ टक्के आहे. लॅपटॉपची चोरी केल्यानंतर सापडण्याची शक्यता खूपच कमी असल्यामुळेच चोरट्यांनी हा मार्ग निवडला आहे. नागरिक निष्काळजीपणे कारमध्ये लॅपटॉप ठेवतात. घराचा दरवाजा उघडा ठेवून हॉलमध्येच लॅपटॉप ठेवलेला असतो. हा निष्काळजीपणा चोरट्यांच्या पथ्यावर पडू लागला आहे.