कर्नाळा अभयारण्यात पक्षी, प्राण्यांवर पाणीसंकट

By admin | Published: May 10, 2016 02:10 AM2016-05-10T02:10:20+5:302016-05-10T02:10:20+5:30

राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. या दुष्काळाचा फटका पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यालादेखील बसल्याचे दिसून येत आहे

Water conservation for birds and animals in Karnala Wildlife Sanctuary | कर्नाळा अभयारण्यात पक्षी, प्राण्यांवर पाणीसंकट

कर्नाळा अभयारण्यात पक्षी, प्राण्यांवर पाणीसंकट

Next

पनवेल : राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. या दुष्काळाचा फटका पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यालादेखील बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अभयारण्याला पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींसह परिसरातील ग्रामस्थांनी वन खात्याकडे जुन्या पाण्याच्या तलाव स्रोतांचा गाळ काढून पुनरुज्जीवित करण्याची मागणी केली आहे.
पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्यात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. त्याचप्रमाणे मोर, लांडोर, माकडे, रानडुकरे, ससे, हरणे व नुकतेच दर्शन झालेले बिबटे व इतर निशाचर प्राणी यांचे वास्तव्य आहे. यातील सुमारे ४ चौरस कि. मी.च्या परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. मुंबईपासून ६२ कि. मी. अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे, कल्हं, रानसई-चिचवण गावाच्या पंचक्रोशीत हे अभयारण्य वसलेले आहे. या ठिकाणी आपण केव्हाही गेलात तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी आढळतात. अगदी परदेशी पर्यटकांनादेखील या अभयरण्याच्या प्रेमात आहेत. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकिळा, फ्लाय कॅचर, भरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शहीन ससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी येथे आढळतात. अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळतात. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण यांचे प्रमाण जास्त आहे तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भेकरे, रानमांजर, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आझळतात. हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असून ते मुंबईपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. हे महाराष्ट्रीतील पहिले पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा येथे निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असून, येथे १५० जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी, ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात. मात्र आज या अभयारण्यातील पक्षी आणि प्राण्यांनादेखील दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे येथे देखील पाण्याचे दुर्भिक्ष दिसून येते. कर्नाळा अभयारण्यात दोन मोठे तलाव आहेत. यापैकी एक तलाव जरी सुकलेला असला तरी एका तलावमध्ये काही प्रमाणात पाणी असल्याचे चित्र दिसत आहे. या तलावातील गाळ काढल्यास या तलावापासून पशु-पक्ष्यांची तहान भागू शकते. परंतु वन अधिकाऱ्यांचे वेगळेच नियाजन या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. तलावांचे खोलीकरण करण्यापेक्षा नवीन तलाव खोदण्याचे काम सुरू केले आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत ही कामे केली जात आहेत. या कामामुळे जुने तलावेही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग या ठिकाणी चालू असल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्या शाखप्रमुखांकडून होत आहे.

Web Title: Water conservation for birds and animals in Karnala Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.