शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

कर्नाळा अभयारण्यात पक्षी, प्राण्यांवर पाणीसंकट

By admin | Published: May 10, 2016 2:10 AM

राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. या दुष्काळाचा फटका पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यालादेखील बसल्याचे दिसून येत आहे

पनवेल : राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. या दुष्काळाचा फटका पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यालादेखील बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अभयारण्याला पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींसह परिसरातील ग्रामस्थांनी वन खात्याकडे जुन्या पाण्याच्या तलाव स्रोतांचा गाळ काढून पुनरुज्जीवित करण्याची मागणी केली आहे. पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्यात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. त्याचप्रमाणे मोर, लांडोर, माकडे, रानडुकरे, ससे, हरणे व नुकतेच दर्शन झालेले बिबटे व इतर निशाचर प्राणी यांचे वास्तव्य आहे. यातील सुमारे ४ चौरस कि. मी.च्या परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. मुंबईपासून ६२ कि. मी. अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे, कल्हं, रानसई-चिचवण गावाच्या पंचक्रोशीत हे अभयारण्य वसलेले आहे. या ठिकाणी आपण केव्हाही गेलात तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी आढळतात. अगदी परदेशी पर्यटकांनादेखील या अभयरण्याच्या प्रेमात आहेत. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकिळा, फ्लाय कॅचर, भरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शहीन ससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी येथे आढळतात. अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळतात. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण यांचे प्रमाण जास्त आहे तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भेकरे, रानमांजर, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आझळतात. हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असून ते मुंबईपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. हे महाराष्ट्रीतील पहिले पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा येथे निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असून, येथे १५० जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी, ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात. मात्र आज या अभयारण्यातील पक्षी आणि प्राण्यांनादेखील दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथे देखील पाण्याचे दुर्भिक्ष दिसून येते. कर्नाळा अभयारण्यात दोन मोठे तलाव आहेत. यापैकी एक तलाव जरी सुकलेला असला तरी एका तलावमध्ये काही प्रमाणात पाणी असल्याचे चित्र दिसत आहे. या तलावातील गाळ काढल्यास या तलावापासून पशु-पक्ष्यांची तहान भागू शकते. परंतु वन अधिकाऱ्यांचे वेगळेच नियाजन या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. तलावांचे खोलीकरण करण्यापेक्षा नवीन तलाव खोदण्याचे काम सुरू केले आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत ही कामे केली जात आहेत. या कामामुळे जुने तलावेही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग या ठिकाणी चालू असल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्या शाखप्रमुखांकडून होत आहे.