खारघरवासीयांचे पाणीसंकट कायम

By admin | Published: June 18, 2017 02:21 AM2017-06-18T02:21:08+5:302017-06-18T02:21:08+5:30

खारघरमधील अनेक सोसायटीमध्ये ऐन पावसाळ्यात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे सिडको विरोधात रिहवाशाची प्रचंड नाराजी आहे. येथील रिहवासी सिडको

The water crisis of Kharghar continued | खारघरवासीयांचे पाणीसंकट कायम

खारघरवासीयांचे पाणीसंकट कायम

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : खारघरमधील अनेक सोसायटीमध्ये ऐन पावसाळ्यात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे सिडको विरोधात रिहवाशाची प्रचंड नाराजी आहे. येथील रिहवासी सिडको विरोधात मोर्च्याच्या पवित्र्यात आहेत.त्यामुळे खारघरमधील पाणी प्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
सुमारे 3 लाखा पेक्षा जास्त लोकसंख्येचा परिसर असलेल्या खारघरमध्ये पाणी प्रश्नावर तोडगा म्हणून बाळगंगा धरणातून पाणी घेऊ असे सिडकोकडून सांगितले जात होते. त्यानंतर सिडकोने कर्जत येथील कोंढाणे धरण ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन दिवसापुर्वी हेटवणे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरूस्तीच्या कामांमुळे १४ जुन रोजी सकाळी ९ पासून ते १५ जून रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. दुरूस्तीच्या कामानंतर पुन्हा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू झाला. अनेक ठीकानी अद्याप हा प्रश्न भेड़सावत आहे. काही ठिकाणी गढ़ूळ पाणी पुरवठा होत आहे. सेक्टर १० मधील कोपरा गावात तीन दिवस पाणीपुरवठा होत नसुन अनेक ठिकाणी गढ़ूळ पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
शहरातील पाणी समस्या सुटली नाहीं तर हज़ारो महिलाना घेवून सिडको विरोधात मोर्च्याचा ईशारा खारघर चा राजा ट्रस्ट चे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला आहे.

दोन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. जलवाहिनीचे काम नव्याने केल्याने व धरण क्षेत्रात पाऊस पडल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे.
- आर. एस. हातवार,
पाणीपुरवठा अधिकारी,
सिडको

Web Title: The water crisis of Kharghar continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.