शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पनवेलकरांवरील पाणीटंचाईचे संकट वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:01 AM

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडकोकडून पाण्याचे नियोजन झाले नाही.

कळंबोली : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडकोकडून पाण्याचे नियोजन झाले नाही. त्याचबरोबर एमजेपीच्या वाहिन्या बदलण्याचा प्रस्तावही तळ्यात, मळ्यात आहे. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. ही भीषणता दिसत असताना आणखी नवीन इमारती उभारण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे भविष्यात आणखी तुटवडा भासण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. सिडकोबरोबरच मनापाकडूनही याबाबत धोरण आखले जात नसल्याने पुढे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पनवेल महापालिका क्षेत्रातील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे त्या तुलनेत महानगराची तहानही रोज वाढत चालली आहे. जवळपास १०० एमएलडी पाणी कमी मिळत असल्याने नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे आणि खारघर या नोडमध्ये पाणीटंचाईची ओरड निर्माण झाली आहे. एमजेपीवर पनवेल, नवीन पनवेल आणि कळंबोली ही तीन महत्त्वाची शहरे पाण्याकरिता अवलंबून आहेत. या वाहिन्या जीर्ण झाल्याने रोज फुटतात. त्या बदली करण्याकरिता किमान तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे. मात्र, त्याची निविदा अद्याप निघालेली नाही. सिडको शहरे विकसित करते. मात्र, पायाभूत सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेने दिल्या पाहिजेत, असे सिडकोचे उच्चपदस्थ अधिकारी सांगतात. त्यांनी सेवाशुल्क घेतले असल्याने पाण्याचा स्रोत निर्माण करून तो महापालिकेकडे हस्तांतर करणे अपेक्षित असल्याचे कांबळे यांचे मत आहे. आता टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, काही ठिकाणी तर पिण्याकरिताही पाणी मिळत नाही. असे असताना सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतले आहेत. कळंबोली, तळोजा या ठिकाणी कामांचा धडाका सुरू आहे. याशिवाय आणखी २५ हजार घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन घरांना पाणी देणार कुठून, असा प्रश्न सत्ताधारी नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित केला आहे. त्याचबरोबर खासगी इमारतींचेही बांधकाम रोडपाली, तळोजा, नावडे तसेच महापालिका क्षेत्रात सुरू आहे, त्यामुळे भविष्यात पाण्याची मोठी ओरड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.>नेहमी टंचाईसदृश परिस्थिती असल्याने आम्ही सुरुवातीलाच पाण्याबाबत ठोस भूमिका घेण्याची आग्रही मागणी केली होती. मात्र, सत्ताधाऱ्याने त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आणि कचरा हस्तांतरात रस दाखवला. आता कचराही वेळेत उचलला जात नाही आणि पाणीही नियमित मिळत नाही.- सतीश पाटील,नगरसेवक, राष्ट्रवादी>पाण्याची टंचाई असल्याने सिडकोने हाती घेतलेले गृहनिर्माण प्रकल्प बंद ठेवावेत, अशी मागणी आपण केलेली आहे. याबाबत मी आणि सभागृहनेते परेश ठाकुरांनी महासभेत सूचनाही मांडली. त्याचबरोबर नवीन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी केली आहे. नियोजनाचे काम सिडकोचे आहे. मात्र, ते महापालिकेकडे बोट दाखवतात.- नीलेश बाविस्कर, नगरसेवक, भाजपा

टॅग्स :panvelपनवेल