कॉ-या बंद करण्यासाठी जलआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:02 AM2018-02-24T01:02:23+5:302018-02-24T01:02:23+5:30
तालुक्यातील वळवली येथील ग्रामस्थांनी वसंत बंधाºयातील कॉरी चालकांनी केलेल्या अतिक्र मणाविरोधात पाण्यात उतरून अनोखे आंदोलन केले.
पनवेल : तालुक्यातील वळवली येथील ग्रामस्थांनी वसंत बंधाºयातील कॉरी चालकांनी केलेल्या अतिक्र मणाविरोधात पाण्यात उतरून अनोखे आंदोलन केले. येथील कॉºया बंद करण्याची मागणी करून दोन वेळा वावंजा, वळप रस्ता ग्रामस्थांनी रोखून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून ग्रामस्थांना रस्ता न रोखण्याचे आवाहन केले. येत्या बुधवारी बेलापूर येथील अतिक्र मण विभागाच्या कार्यालयात बैठक घेऊन कॉरीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
वळवली गावातील वसंत बंधारा तलावात कॉरी चालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्र मण केले आहे. दगडखाणीत वारंवार होणाºया स्फोटामुळे गावातील घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे हे अतिक्र मण हटविण्यासाठी व गावातील घरे वाचविण्यासाठी शुक्रवारी वळवली ग्रामस्थांतर्फे जल आंदोलन करण्यात आले. सकाळी १० वाजता या आंदोलनाला सुरु वात केली. गावाबाहेर असणाºया बंधाºयाजवळ येताच शेकडो ग्रामस्थांनी वळप रस्ता अडवून धरला. त्यामुळे परिसरात वाहनांची गर्दी झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत ग्रामस्थांना हटवून रस्ता मोकळा करून दिला.
कॉरीसाठी करण्यात येणाºया स्फोटामुळे नागरिकांचे जीवही धोक्यात आले आहेत. कॉºयामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. कॉºयांमध्ये दिवस-रात्र सुरु ंग सुरू असतात. या आवाजाचा प्रचंड त्रास होत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी या वेळी केला. आंदोलन सुरू होऊन तीन तास झाले तरी सिडकोचे अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत जोपर्यंत सिडको अधिकारी येत नाहीत तोपर्यंत जलआंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. या वेळी बंधाºयात उभे राहून ग्रामस्थांनी भजन गायले. २०१४ मध्येही येथील कॉरी बंद करण्यासाठी ग्रामस्थांतर्फे तक्र ार करण्यात आली आहे. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. या वेळी महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, पोलीस निरीक्षक बी. सय्यद, नगरसेवक गोपाळ भगत, महादू मदे, प्रज्योती म्हात्रे, शशिकांत शेळके आदी उपस्थित होते. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.