नवीन पनवेलमध्ये पाणीटंचाईची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:53 AM2018-06-12T04:53:40+5:302018-06-12T04:53:40+5:30
नवीन पनवेलमधील सिडको इमारतींना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. विविध कारणांमुळे येथील इमारतींना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
कळंबोली - नवीन पनवेलमधील सिडको इमारतींना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. विविध कारणांमुळे येथील इमारतींना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या विरोधात सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाला गुरु वारपर्यंतचा अल्टिमेटम देत हंडा मोर्चाचा इशारा दिला .
एमजेपीकडून मागणीप्रमाणे सिडकोला पाणी दिले जात नाही. कारण जुनाट झालेल्या जलवाहिन्यांना फुटल्या आहेत. त्याचबरोबर टाटा पॉवर कंपनीकडून रविवार आणि सुटीच्या दिवशी शटडाऊन घेतला जातो. त्यामुळे पाताळगंगा नदीत पाणी सोडले जात नसल्याने एमजेपीला पाणी मिळत नाही. त्याचा परिणाम सिडको वसाहतीतील पाणीपुरवठ्यावर होत आहे. नवीन पनवेलमध्ये सर्वाधिक पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षभरापासून सिडको इमारतींना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. या ठिकाणी पाणी साठवणूक करण्याकरिता टाक्या नाहीत. त्यामुळे सिडकोने सोडलेल्या पाण्यावर येथील रहिवाशांना अवलंबून राहावे लागते. गेल्या महिन्यापासून सेक्टर १३, १४ व १५ या विभागात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. येथील ए टाईप, बी-१0 , ई-१ मधील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार तक्र ारी करु नही पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा होत नसल्याने येथील रहिवाशांनी माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर हल्लाबोल करण्यात आला. सिडकोचे सहाय्यक अभियंता राहुल सरवदे यांना जाब विचारण्यात आला. अनियमित वीजपुरवठा, एमजेपीच्या जुनाट जलवाहिन्या अशी कारणे देत मोर्चेकºयांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला मुबलक पाणी देण्याची जबाबदारी सिडकोचीच असल्याची भूमिका घरत यांनी घेतली. त्यांनी या प्रश्नाबाबत अधीक्षक अभियंता प्रशांत काळे यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली.
नवीन पनवेलमध्ये मुबलक पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. याकरिता सिडको उपाययोजना करत नाही म्हणून आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु वारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर हंडा मोर्चा काढण्यात येईल.
- सुनील घरत,
माजी नगराध्यक्ष, पनवेल
एमजेपीकडून गेल्या काही दिवसांपासून कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे काही प्रमाणात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याकरिता एमजेपीकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.
- दिलीप बोकाडे,
कार्यकारी अभियंता सिडको .