शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

एकीकडे पाणी टंचाई दुसरीकडे प्रचंड नासाडी, कोपरा पुलावर पाणीगळती रोखणार कोण? 

By वैभव गायकर | Published: May 05, 2023 6:35 PM

एकीकडे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरु आहे. त्यातच याठिकाणी लागलेली पाणी गळती थांबता थांबेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वैभव गायकर पनवेल - सिडकोने घाई घाईने उभारलेल्या नव्या कोपरा पुलावर मागील आठवडाभर पाणी गळती सुरु आहे. याच ठिकाणावरून नवी मुंबई महानगरपालिकेची जलवाहिनी गेली आहे. मात्र गळती लागलेली जलवाहिनी कोणाची आहे. ही बाब स्पष्ट होत नसली, तरी ददरोज मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी याठिकाणी सुरु आहे. एकीकडे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरु आहे. त्यातच याठिकाणी लागलेली पाणी गळती थांबता थांबेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

खारघर शहरात मागील महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र भुषण सोहळ्यासाठी सिडकोने एका रात्रीत कोपरा पुल मातीचा भराव टाकून उभारला होता.शहरातील मुख्य नाल्यावर केवळ एक पाईप टाकून घाईत उभारताना सिडकोने सर्व नियम पायदळी तुडवले होते.या पुलामुळे शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटल्याने नागरिकांनी याचे स्वागत केले होते. मात्र याठिकाणी लागणारी पाणी गळती,भविष्यात पावसाच्या पाण्याला होणारा अडथळा लक्षात घेता सिडकोचे नियोजनशून्य कारभार यामुळे पाहावयास मिळत आहे. 

याठिकाणाहून दररोज येजा करणारे गुणेश ठाकुर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.रोज सकाळी याठिकाणी पाण्याला गळती लागुन लाखो लिटर पाणी वाहून सायन पनवेल महामार्गावर जातो.रोज प्रकार घडून देखील याबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर खेदाची बाब असल्याचे गुणेश ठाकुर यांनी सांगितले.एकीकडे पनवेल शहरात पाण्याची टंचाई असताना अशाप्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर हि शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :panvelपनवेलwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात