नवी मुंबई : मोरबे धरणामध्ये ४१ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक विभागात आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला बेलापूर ते ऐरोलीपर्यंत मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये खारघर, कामोठे परिसरामध्येही मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये पाणी बचत करता यावी, यासाठी प्रत्येक विभागात आठवड्यातून दोन दिवस सायंकाळी पाणी कपात सुरू केली होती. रोज सकाळी नियमित पाणीपुरवठा केला जात होता. सद्य:स्थितीमध्ये धरणामध्ये ४१ दिवस पुरेल एवढे पाणी आहे. पाऊस पडला नाही तरी २५ जुलैपर्यंत शहरवासीयांना पाणी पुरविणे शक्य आहे; परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळच्या पाणी कपातीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापुढे आठवड्यातून तीन दिवस सायंकाळी पाणीपुरवठा केला जाणार नाही.
पुरेसा पाऊस पडून धरणाची पातळी वाढत नाही तोपर्यंत उपलब्ध जलसाठा जपून वापरावा लागणार आहे. पाण्याची उधळपट्टी थांबवावी यासाठी सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. सकाळी पाणीपुरवठा नियमित होणार असून, सायंकाळी आठवड्यातून तीन दिवस कपात केली जाणार आहे. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
विभागनिहाय सायंकाळच्या पाणीपुरवठा बंदचे वेळापत्रकविभाग - पाणी बंदचा वारबेलापूर - सोमवार, बुधवारी, शुक्रवारनेरूळ - मंगळवार, गुरुवार, शनिवारतुर्भे - मंगळवार, गुरुवार, रविवारवाशी - सोमवार, बुधवार, शुक्रवारकोपरखैरणे - मंगळवार, गुरुवार, शनिवारघणसोली - बुधवार, शुक्रवार, रविवारऐरोली - मंगळवार, शुक्रवारखारघर, कामोठे - सोमवार, गुरुवार, शनिवार
मोरबे धरणातील पाणीसाठ्याचा तपशीलधरणाची लांबी - ३२५० मीटरपाणीसाठवण क्षेत्र - ५७८९ हेक्टरग्रॉस स्टोरेज - १९० एमसीएमसद्य:स्थितीमधील साठा - ५० एमसीएमडेड साठा - ५.५२ एमसीएमबाष्पीभवन - १०.६८ एमसीएमकधीपर्यंत पुरणार? - ४१ दिवस
धरणातील गतवर्षाच्या तुलनेतील साठावर्गीकरण - २०२३ - २०२४आजचा पाऊस - ६.४० मि.मी. - ० मि.मी.आतापर्यंतचा पाऊस - ११.२० मि.मी. - ६९.४० मि.मी.धरण पातळी - ६९.३९मी. - ६९.४२मी.ग्रॉस स्टोअरेज - ४९.९५एमसीएम - ५०.१०एमसीएम