चिकणी आदिवासीवाडीचा पाणीपुरवठा ठप्प

By admin | Published: May 12, 2017 01:54 AM2017-05-12T01:54:33+5:302017-05-12T01:54:51+5:30

चिकणी येथील आदिवासीवाडीत पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाची थकबाकी झाल्याने महावितरणने पंप हाऊसचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

Water supply of sweet Adivasi wadi jam | चिकणी आदिवासीवाडीचा पाणीपुरवठा ठप्प

चिकणी आदिवासीवाडीचा पाणीपुरवठा ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागोठणे : चिकणी येथील आदिवासीवाडीत पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाची थकबाकी झाल्याने महावितरणने पंप हाऊसचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. यामुळे पाणी वर पोहोचत नाही. गेल्या तीन महिन्यांपासून आदिवासी बांधवांना पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.
पाटणसई हद्दीत चिकणीसह अनेक गावे, आदिवासीवाड्या येतात. बहुतेक ठिकाणच्या पंप हाऊसमधील विद्युत बिलाची थकबाकी झाल्याने नागोठणे विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यानंतर चिकणी आदिवासीवाडी वगळता काही दिवसांतच सर्व ठिकाणी थकबाकी भरली गेल्याने तेथील पाणीपुरवठा पूर्ववत चालू झाला होता. चिकणीकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या आसपास गावातील घरांना याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला आहे. आम्ही नियमितपणे पैसे भरतो, तरी विद्युत पुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त के ली.

Web Title: Water supply of sweet Adivasi wadi jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.