मलनि:सारणचे पाणी वसाहतीमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 02:19 AM2018-07-15T02:19:34+5:302018-07-15T02:20:00+5:30

मलनि:सारण वाहिन्या तुंबल्यामुळे येथील के एल-४ मधील घरांमध्ये सांडपाणी येऊ लागले आहे.

Water: In the water colony of Saran | मलनि:सारणचे पाणी वसाहतीमध्ये

मलनि:सारणचे पाणी वसाहतीमध्ये

Next

अरुणकुमार मेहेत्रे 
कळंबोली : मलनि:सारण वाहिन्या तुंबल्यामुळे येथील के एल-४ मधील घरांमध्ये सांडपाणी येऊ लागले आहे. त्यामुळे येथील २०० कुटुंबांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याबाबत सिडकोला वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यांना न्याय देण्याकरिता कळंबोली विकास समिती थेट व्यवस्थापकीय संचालकांकडे दाद मागणार असल्याचे प्रशांत रणावरे यांनी सांगितले.
सिडकोने सर्वातअगोदर कळंबोली वसाहत विकसित केली. या ठिकाणी सुरुवातीला बांधण्यात आलेले सिडकोची घरे जुनाट आणि जीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर त्या काळात या नोडमध्ये मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आल्या; परंतु आता लोकसंख्येत वाढ झाली असताना त्याच मलनि:सारण वाहिन्या आहेत. या व्यतिरिक्त कळंबोली वसाहत तीन मीटर खाली असल्याने भरतीचे पाणी आतमध्ये येते, कमी पावसातही दोन ते अडीच फूट पाणी साचते. त्यात सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्या असल्याने मलमिश्रीत पाण्याचा निचरा होत नाही. या कारणाने हे पाणी इमारत परिसरात साचते. के एल-४ येथे अशी परिस्थिती उद्भवली आहे. बाजूच्या मलनि:सारण वाहिन्यांना गळती लागली आहे. त्याचबरोबर त्या तुंबल्या असल्याने पाणी पुढे जात नाही. याच कारणाने काही रहिवाशांच्या घरात पाणी झिरपत आहे. काहींच्या स्वयंपाकघरात सांडपाणी साचत आहे. त्यामुळे स्वयंपाक करायचा कसा, असा प्रश्न गृहिंणीना पडत आहे. कित्येक जण कॉटवर बसून जेवण करतात, इतक्या बिकट परिस्थितीला रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. मलमिश्रीत पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहेच, त्याचबरोबर घरात दलदल निर्माण झाली आहे. साथीचे रोग व अन्य आजार पसरले आहेत. गेल्या २५ दिवसांपासून ही समस्या जटील बनली आहे. मुख्य रस्त्यावरील चेंबरमधून मलमूत्र पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे हा त्रास होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. याबाबत सिडकोकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या नाहीत म्हणून संबंधितांनी कळंबोली विकास समितीला या बाबत माहिती दिली.
के एल-४ मध्ये रहिवाशांच्या किचनमध्ये सांडपाणी जात आहे, त्यामुळे त्यांना अन्नही खाता येत नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे. लहान मुले आजारी पडू लागली आहेत. कमालीची दुर्गंधी पसरली असल्याने २०० कुटुंबे त्रस्त आहेत, याबाबत थेट सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना तक्र ार करणार आहोत.
- प्रशांत रणवरे,
कळंबोली विकास समिती

Web Title: Water: In the water colony of Saran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.