नवी मुंबईः सिडकोच्या ढिसाळ नियोजनाचा फटका खारघरमधील स्वप्नपूर्ती सोसायटीतील रहिवाशांना बसत आहे. गेले दोन दिवस शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे स्वप्नपूर्ती सोसायटीत गुडघाभर पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. सिडकोला याबाबत सांगूनही त्यांच्याकडून योग्य ती पाऊल उचलली जात नसल्याची तक्रार येथील रहिवाशी करत आहे. गेल्यावर्षीही येथील रहिवाशांना या समस्येचा सामना करावा लागला होता.
सिडकोनं तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या प्रकल्पात रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही घरांत गळतीच्या समस्याही निर्माण झालेल्या आहेत. स्वप्नपूर्ती सोसायटीच्या मागे खासगी बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने ते पाणी स्वप्नपूर्तीच्या संरक्षण भींतीतून सोसायटीत शिरले आहे. आता संपूर्ण सोसायटीत पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे..