तळोजातील एमआयडीसीत पाणीकपात
By admin | Published: February 17, 2017 02:19 AM2017-02-17T02:19:15+5:302017-02-17T02:19:15+5:30
तळोजा औद्योगिक विभागातील कारखान्यांकडून प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत सोडले जाते. यामुळे नागरिकांचे आरोग्य
तळोजा : तळोजा औद्योगिक विभागातील कारखान्यांकडून प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत सोडले जाते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने येथील कारखान्यात ४० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परिसरात प्रदूषणाला आळा बसेल, असा विश्वास प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून व्यक्त होत आहे.
पाणीकपातीमुळे काही कारखान्यांना तोटा होणार असल्याने छोट्या कारखानदारांकडून नाराजी व्यक्त होत आहेत. जलप्रदूषणावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन व कारखाना मालकांच्या संयुक्त विद्यमाने २००२ मध्ये सीईटीपी प्रकल्प उभा करण्यात आला. मात्र तळोजातील कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रि या करणारा सीईटीपी प्रकल्पाचा खर्च परवडणारा नसल्याने अनेकदा अशुध्द पाणीच कासाडी नदीपात्रात सोडले जाते. जलप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कारखान्यातील दूषित पाणी जमिनीत मुरत असल्याने बोअरवेलमार्फत येणारे पाणीही दूषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दमा, छातीत दुखणे, पोटात गॅस होणे, लहान मुलांना अशक्तपणा येणे यासारख्या व्याधी जडत आहेत.