काश्मीरप्रकरणी ऐतिहासिक निर्णयाचे महायज्ञाद्वारे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:02 AM2019-08-09T01:02:15+5:302019-08-09T01:02:26+5:30
कलम ३७० रद्द : खारघरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल : काश्मीरमधील कलम ३७० व ३५ अ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. काश्मीरमधील मूळ रहिवासी असलेल्या काश्मिरी पंडित समाजाने महायज्ञ करून निर्णयाचे स्वागत केले आहे. खारघरमधील शारदा सदन याठिकाणी पंडित असोसिएशनच्या माध्यमातून गुरुवारी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
काश्मिरी पंडित समाजाची कुलदेवता शारदा मातेच पूजा करून काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी या उद्देशाने महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. काश्मीरमधील काश्मिरी पंडित समाज तेथील मूळ समाज आहे. काही कारणास्तव या समाजाला आपली घरे सोडून स्थलांतरित व्हावे लागले. आपल्या मायभूमीत पुन्हा आपल्याला आदिवास करता यावा या हेतुने माता शारदेची यावेळी मनोकामना करण्यात आली. नवी मुंबई मध्ये काश्मिरी पंडित समाजाची जवळ जवळ ४०० कुटूंब वास्तव्यास आहेत. कार्यक्रमादरम्यान दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. सेनेचे नवी मुंबई मधील नेते विजय नहाटा यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावण्यात आली होती .