लेट लतीफ कर्मचा-यांचे झेंडूची फुले देऊन स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:47 AM2018-02-21T01:47:07+5:302018-02-21T01:47:07+5:30
पनवेल महापालिकेतील नेहमीच उशिरा येणा-या लेट लतीफ कर्मचाºयांना मंगळवारी महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी अनोखी समज दिली.
पनवेल : पनवेल महापालिकेतील नेहमीच उशिरा येणा-या लेट लतीफ कर्मचाºयांना मंगळवारी महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी अनोखी समज दिली. उशिरा येणाºया ३६ कर्मचारी व अधिकाºयांचे झेंडूची फुले देऊन स्वागत करण्यात आले, तसेच यापुढे उशिरा न येण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
पनवेल महापालिकेचा गाढा सध्या अत्यंत कमी कर्मचाºयांच्या संख्येने हाकला जात आहे. यामुळे महापालिकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. त्यात काही कर्मचारी व अधिकारी सातत्याने उशिराने येत असल्याने नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो. शिवाय, महापालिकेच्या कामकाजावरही नागरिकांकडून नावे ठेवली जातात.
लेट लतीफ कर्मचाºयांना याआधीही सूचना दिल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मंगळवारी झेंडूची फुले देऊन ३६ लेट लतिफांना वेळेत येण्याची समज देण्यात आल्याचे लेंगरेकर यांनी सांगितले. शिवाय, यापुढे उशिराने आल्यास रजा खर्ची टाकण्यात येईल, अशा सूचनाही देण्यात आल्या. या लेट लतीफ कर्मचाºयांमध्ये उपायुक्तांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.