तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 10:13 AM2024-11-15T10:13:15+5:302024-11-15T10:13:32+5:30

सकाळी जाग आल्यानंतर तरुणाला अंगावरील दोन सोन्याच्या चेन व दोन मोबाइल लंपास झाल्याचे लक्षात आले.

Went to the lodge as the young lady called But then a shocking thing happened to the young man | तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!

तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : तरुणीच्या इशाऱ्यावर तिच्यासोबत लॉजवर गेलेल्या तरुणाला लुटल्याची घटना एपीएमसी परिसरात घडली. या तरुणीने पेढा देऊन तरुणाला बेशुद्ध केले आणि त्यानंतर त्याच्याकडील ऐवज लुटून तेथून धूम ठोकली. दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणाला जाग आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी एपीएमसी पोलिस अधिक तपास करत आहेत.

शहरात प्रतिष्ठित व्यक्तींपासून सर्वसामान्यांनादेखील ‘हनी ट्रॅप’मध्ये गळाला लावणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. त्यांच्याकडून अनेकांना सोशल मीडियावर मैत्री करून भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातच आता थेट लॉजवर बोलावून लुटणारी टोळीदेखील सक्रिय असल्याचे एपीएमसी परिसरातील प्रकरणातून समोर आले आहे. जुहूगाव परिसरात राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणासोबत एका तरुणीने फेसबुक मैत्री केली. त्यातून या तरुणीने त्याला एपीएमसी येथील एका लॉजवर बोलवले. तिच्या निमंत्रणाला भुलून हा तरुण त्याठिकाणी गेला. लॉजमधील खोलीत गेल्यावर या तरुणीने त्याला पेढा खायला दिला. तो खाताच काही वेळातच तो बेशुद्ध पडला.

सकाळी जाग आल्यानंतर तरुणाला अंगावरील दोन सोन्याच्या चेन व दोन मोबाइल लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यावरून आपण ‘हनी ट्रॅप’चा शिकार होऊन लुटलो गेल्याचे तरुणाच्या लक्षात आले. याप्रकरणी त्याने एपीएमसी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्यात तिच्यासह इतरांचाही समावेश असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यावरून पोलिस या टोळीचा छडा लावण्यासाठी सखोल तपास करत आहेत.

Web Title: Went to the lodge as the young lady called But then a shocking thing happened to the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.