नवी मुंबईत गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विद्युत, इंधननिर्मिती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 02:59 AM2021-02-08T02:59:40+5:302021-02-08T02:59:55+5:30

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या नेटकनेक्ट फाऊंडेशन या संस्थेने यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी अलिकडेच चर्चा केली. हैद्राबाद येथील बोईपल्ली शहराच्या धर्तीवर वाया जाणाऱ्या भाज्यांवर प्रक्रिया करून विद्युत निर्मित्ती करण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे मांडला.

The wet waste collected in Navi Mumbai will be processed to generate electricity and fuel | नवी मुंबईत गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विद्युत, इंधननिर्मिती करणार

नवी मुंबईत गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विद्युत, इंधननिर्मिती करणार

Next

नवी मुंबई : नवी मुंबईत गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन व विद्युत निर्मित्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सुमारे दीडशे मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. हा बायोगॅस पालिकेची वाहने आणि एनएमएमटीच्या बसेससाठी वापरला जाणार आहे. तसेच टाकाऊ भाज्यांपासून विद्युत निर्मित्ती तयार करण्याची तयारीही महापालिकेने दर्शविली आहे.

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या नेटकनेक्ट फाऊंडेशन या संस्थेने यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी अलिकडेच चर्चा केली. हैद्राबाद येथील बोईपल्ली शहराच्या धर्तीवर वाया जाणाऱ्या भाज्यांवर प्रक्रिया करून विद्युत निर्मित्ती करण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे मांडला. त्या चर्चेनुसार बांगर यांनी टाकाऊ भाजीपाल्यापासून विद्युत निर्मित्ती करण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बी. एन. कुमार यांनी स्पष्ट केले आहे. नवी मुंबईत दिवसाला साधारण ७०० मेट्रीक टन कचरा गोळा होतो. यात एपीएमसीतील फळ आणि भाजी मार्केटमध्ये सर्वाधिक ओला कचरा गोळा होतो. त्याशिवाय शहरातील हॉटेल्समधूनसुध्दा मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होतो. एकूण निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे वर्गीकरण केल्यास जवळपास दीड मेट्रीक टन ओला कचरा तयार होतो. या ओल्या कचऱ्यापासून इंधन निर्मित्ती करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यानुसार लवकरच शहरात दोन सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या दोन्ही परिमंडलांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे दोन बायोगॅस प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.

हैद्राबाद येथील बोईपल्ली या शहरात दिवसाला १० टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून ५०० मेगा युनिट विद्युत तर ३० किलो बायोगॅसची निर्मित्ती केली जाते. नवी मुंबईत असा प्रयोग केल्यास नक्कीच त्याचा फायदा होईल. शिवाय पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होणार आहे.
- बी. एन. कुमार, संचालक, 
नेटकनेक्ट फाऊंडेशन

Web Title: The wet waste collected in Navi Mumbai will be processed to generate electricity and fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.