पुतळ्याचे अनावरण कधी?

By admin | Published: August 20, 2015 02:01 AM2015-08-20T02:01:12+5:302015-08-20T02:01:12+5:30

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पनवेलचे सुपुत्र. त्यांचे मूळ गाव पनवेल तालुक्यातीलच शिरढोण आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या

When the statue unveiled? | पुतळ्याचे अनावरण कधी?

पुतळ्याचे अनावरण कधी?

Next

वैभव गायकर, पनवेल
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पनवेलचे सुपुत्र. त्यांचे मूळ गाव पनवेल तालुक्यातीलच शिरढोण आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या या क्रांतिकारकाच्या नावाने पनवेल नगरपरिषदेने १८ ते १९ कोटी रुपये खर्च करून नाट्यगृह उभारले आहे. या नाट्यगृहात फडके यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे, मात्र नगरपरिषदेला त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
पंधरा दिवसांपूर्वी नगरपरिषदेने नाट्यगृहात हा पुतळा बसवला. नाट्यगृहात प्रवेश करताच समोरच हा लाल आवरणात बांधलेला पुतळा नजरेस पडतो. त्याचे अद्याप अनावरण झाले नसल्याबद्दल अनेक प्रेक्षकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. पुतळ्याला अशाप्रकारे झाकूनच ठेवायचे होते, तर तो पुतळा बसविण्याची घाई केलीच का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा पुतळा बसविण्यासाठी नगरपरिषदेने टेंडर काढले होते. त्याची किं मत ३ लाख २५ हजार एवढी आहे. हा पुतळा कास्टिंग बनावटीचा आहे. यापूर्वी नगरपरिषदेने संगमरवरी पुतळा बसवला होता, मात्र तो टिकाऊ व आकर्षक नसल्यामुळे कास्टिंगचा पुतळा बसविण्यात आला.
पुतळ्याच्या अनावरणासाठी यापूर्वी ९ आॅगस्ट व त्यानंतर १५ आॅगस्ट या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांना नगरपरिषदेच्या वतीने निमंत्रण देण्यात आले होते. मात्र मंत्री महोदयांना वेळ मिळत नसल्यामुळे हे उद्घाटन पुढे ढकलले गेल्याचे बोलले जात आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य मोठे आहे. भारताच्या इतिहासात त्यांच्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटला आहे. नुकतीच त्यांच्या मूळ गावी शिरढोण येथे असलेल्या त्यांच्या वाड्याची डागडुजी करण्यात आली. त्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याठिकाणी आद्य क्रांतिकारकांचे भव्य स्मारक देखील लवकरच उभारले जाणार आहे.

Web Title: When the statue unveiled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.