शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

पुतळ्याचे अनावरण कधी?

By admin | Published: August 20, 2015 2:01 AM

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पनवेलचे सुपुत्र. त्यांचे मूळ गाव पनवेल तालुक्यातीलच शिरढोण आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या

वैभव गायकर, पनवेलआद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पनवेलचे सुपुत्र. त्यांचे मूळ गाव पनवेल तालुक्यातीलच शिरढोण आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या या क्रांतिकारकाच्या नावाने पनवेल नगरपरिषदेने १८ ते १९ कोटी रुपये खर्च करून नाट्यगृह उभारले आहे. या नाट्यगृहात फडके यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे, मात्र नगरपरिषदेला त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.पंधरा दिवसांपूर्वी नगरपरिषदेने नाट्यगृहात हा पुतळा बसवला. नाट्यगृहात प्रवेश करताच समोरच हा लाल आवरणात बांधलेला पुतळा नजरेस पडतो. त्याचे अद्याप अनावरण झाले नसल्याबद्दल अनेक प्रेक्षकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. पुतळ्याला अशाप्रकारे झाकूनच ठेवायचे होते, तर तो पुतळा बसविण्याची घाई केलीच का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा पुतळा बसविण्यासाठी नगरपरिषदेने टेंडर काढले होते. त्याची किं मत ३ लाख २५ हजार एवढी आहे. हा पुतळा कास्टिंग बनावटीचा आहे. यापूर्वी नगरपरिषदेने संगमरवरी पुतळा बसवला होता, मात्र तो टिकाऊ व आकर्षक नसल्यामुळे कास्टिंगचा पुतळा बसविण्यात आला. पुतळ्याच्या अनावरणासाठी यापूर्वी ९ आॅगस्ट व त्यानंतर १५ आॅगस्ट या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांना नगरपरिषदेच्या वतीने निमंत्रण देण्यात आले होते. मात्र मंत्री महोदयांना वेळ मिळत नसल्यामुळे हे उद्घाटन पुढे ढकलले गेल्याचे बोलले जात आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य मोठे आहे. भारताच्या इतिहासात त्यांच्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटला आहे. नुकतीच त्यांच्या मूळ गावी शिरढोण येथे असलेल्या त्यांच्या वाड्याची डागडुजी करण्यात आली. त्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याठिकाणी आद्य क्रांतिकारकांचे भव्य स्मारक देखील लवकरच उभारले जाणार आहे.