शहरं
Join us  
Trending Stories
1
'सूर्याचा कॅच अन् आम्ही 50 जणांनी 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट', CM शिंदेंची तुफान फटकेबाजी
2
“मुंबईत १ लाख लोक मावतील एवढे स्टेडियम व्हावे”; फडणवीसांची रोहित शर्मा समोरच मागणी
3
Rohit Sharma Suryakumar Yadav, Maharashtra Vidhan Bhavan Felicitation: "तर मी सूर्याला बसवलं असतं.."; विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग, सभागृहात पिकला हशा
4
CM शिंदेंच्या नातवाशी रंगला रोहित शर्माचा लडिवाळ संवाद... पाहा आजच्या कार्यक्रमाचे Photos
5
लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी
6
टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 
8
Video: 'माझ्याबद्दल खुप वाईट बोललं गेलं, पण मी...' PM मोदींसमोर हार्दिकने मांडल्या वेदना
9
कॅच हातात बसला, आपण आणखी एक वर्ल्डकप जिंकू; सूर्याचे विधानसभेला मराठीतून आश्वासन
10
मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...
11
“ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार
12
'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी यांचा 'वर्षा'वर सत्कार
13
संगीत सेरेमनी, गृहपूजा, 2 रिसेप्शन अन्...; असा आहे अनंत-राधिकाच्या 14 जुलाईपर्यंत चालणाऱ्या लग्नसोबळ्याचा संपूर्ण कार्यक्रम
14
PM मोदींनी रोहित-विराटशी काय गप्पा मारल्या? द्रविडला काय विचारलं? पाहा धमाल Video
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हजारो नॉन एसी डबे वाढवण्याची रेल्वेची तयारी
16
“अर्थसंकल्प आकड्यांचा खेळ, अदानींच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत”; विजय वडेट्टीवारांची टीका
17
अमृतपाल सिंग यांनी घेतली खासदारकीची शपथ, विशेष विमानाने आणले दिल्लीत
18
Mahindra Thar 5 Door ची वाट पहाताय? मग, 3 नवीन फीचर्स मिळू शकतात
19
“वारीत पायी चालत जाणार”; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, कुठे अन् कधी होणार सहभागी?
20
नियम बदलले! सीम कार्ड सुरू ठेवायचं असेल तर 'हे' काम करु; नाहीतर नंबर होणार बंद

सीबीटीसीच्या कूर्म गतीमुळे लोकल वेळेवर धावणार कधी? १६ हजार कोटींचा खर्च

By नारायण जाधव | Published: June 28, 2024 10:21 AM

१६ हजार कोटींचा खर्च : सिडकोसह मुंबई, नवी मुंबई पालिकेवर भार

नारायण जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: लोकलच्या वेळापत्रकात आमूलाग्र बदल घडवून चाकरमान्यांची लेटमार्कपासून सुटका करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महामुंबई क्षेत्रातील रेल्वे मार्गांवर कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सुमारे १५ हजार ९०९ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाची घोषणा २०१८ मध्ये केली होती. मात्र, यासाठीचा आपला ५० टक्के हिस्सा देण्यास असमर्थता दर्शवून महाराष्ट्र शासनाने यातील चर्चगेट-विरार धिमा मार्ग आणि सीएसटी-पनवेल धिम्या मार्गासाठीच्या १३ हजार कोटींहून अधिक खर्चाची जबाबदारी सिडको, एमएमआरडीएसह मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेवर ढकलली होती. परंतु, मुंबई आणि नवी मुंबई केंद्राच्या प्रकल्पास  आम्ही का पैसे द्यायचे, असे सांगून निधी देण्यास नकार दिला होता. यामुळे एकीकडे लोकलची वाढलेली संख्या तर दुसरीकडे निधीची चणचण यामुळे सीबीटीसीचे काम कूर्म गतीने सुरू असल्याने  लोकल वेळेवर धावणार कधी, असा प्रश्न प्रवासी करीत आहेत.

नवी मुंबई महापालिकेचा ठराव केला विखंडितसीबीटीसी प्रकल्पासाठी १३९३ कोटी ५५ लाख रुपये देण्याचा आयुक्तांचा ठराव नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने नामंजूर केला. त्या ठराव क्रमांक ९२३ ला विखंडित करण्याची विनंती नंतर आलेल्या आयुक्तांनी शासनास २७ जुलै २०२३ रोजी केली हाेती. त्यानुसार नगरविकास विभागाने तो २९ नोव्हेंबर २०२३ रोजी विखंडित केला आहे. परंतु, गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने शासनाचे फावले आहे.

- सीबीटीसी प्रणालीनुसार अत्याधुनिक अशा संदेशवहनाने मोटरमन, गार्ड आणि नियंत्रण कक्ष यांच्यात सिग्नल यंत्रणेबाबत समन्वय होऊन वाहतूक सुरळीत आणि अपघातविरहित होण्यास मदत होणार आहे.- दोन लोकलमधील अंतर कमी होऊन मुंबईकरांना जास्तीच्या लोकल उपलब्ध होणार आहेत. यात अधिकच्या लोकलसाठी डब्यांची खरेदीदेखील करण्यात येणार होती.- सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेचा कारभार पूर्णत: सिग्नल यंत्रणेनुसार चालतो. त्यामुळे उपनगरीय वाहतूक वेळेवर होण्यात अडचणी येतात.- सीबीटीसीसाठी एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिकेने प्रत्येकी १५ टक्के तर नवी मुंबई महापालिकेने तो ५ टक्के खर्च उचलावा, असे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने तेव्हा दिले होते. 

प्रणालीची रखडपट्टी मुंबईतील चर्चगेट-विरार धिमा मार्ग, सीएसटी-कल्याण-कसारा धिमा मार्ग आणि सीएसटी पनवेल धिमा मार्ग या तीन उपनगरीय मार्गांवर सीबीटीसी प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यास रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मान्यता दिली होती. यानुसार सीएसटी-कल्याण-कसारा मार्गावर ही प्रणाली लागू करण्याचा खर्च ९००० कोटी, चर्चगेट-विरार मार्गाचा खर्च ४२२३ कोटी आणि सीएसटी-पनवेल मार्गाचा खर्च ४००० कोटींहून अधिक असेल असे तेव्हा सांगण्यात आले होते. यातील आता पहिल्या टप्प्यात चर्चगेट-विरार धिमा मार्ग आणि सीएसटी-पनवेल धिम्या मार्गावर ही प्रणाली लागू करण्यात येणार होती. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईrailwayरेल्वे