४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 03:14 AM2018-11-15T03:14:49+5:302018-11-15T03:15:19+5:30

पालिका अधिकाऱ्यांना निर्देश : नसीम खान यांनी घेतली आयुक्तांची भेट

Width of Kurla-Andheri road in 45 days | ४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा

४५ दिवसांत कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करा

Next

मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाºया कुर्ला - अंधेरी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू करून, ४५ दिवसांत कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित पालिका अधिकाºयांना दिले आहेत. चांदिवली विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आमदार नसीम खान यांनी बुधवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली.

एल वॉर्डमधील अधिकाºयांमुळेच कुर्ला-अंधेरी मार्गाचे रुंदीकरण थांबले आहे. साकी नाका ते कमानी आणि बैल बाजार ते अशोक लेलँडस् दरम्यानच्या रुंदीकरणाचे काम ठप्प झाल्याने, मुंबईकरांना विनाकारण वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खान यांनी आयुक्तांकडे केली. या रस्ता रुंदीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर सातत्याने बैठका झाल्या. मात्र, एल वॉर्डच्या अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे रुंदीकरणाचे काम रखडल्याचे खान यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. बैल बाजार मॅटर्निटी हॉस्पिटलमधील आवश्यक पदांची भरती करावी, अशी मागणीही त्यांनी केली़

कचरा समस्या, रस्त्यांची दुरुस्ती

च्आयुक्तांनी तातडीने रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचे निर्देश देत, ४५ दिवसांत काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्याचे खान यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. याशिवाय चांदिवली भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या, विविध ठिकाणची कचºयाची समस्या, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आदी कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी खान यांनी या वेळी केली.
 

Web Title: Width of Kurla-Andheri road in 45 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.