कळंबोली ते शेडुंग रस्त्याचे रुंदीकरण!
By admin | Published: September 26, 2016 02:29 AM2016-09-26T02:29:03+5:302016-09-26T02:29:03+5:30
कळंबोली ते शेडुंग या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४ रस्त्याचे लवकरच रु ंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची लवकरच सुटका होणार आहे. रा
नितीन देशमुख , पनवेल
कळंबोली ते शेडुंग या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४ रस्त्याचे लवकरच रु ंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची लवकरच सुटका होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा शिळफाट्यापासून सुरू होऊन पुण्यापर्यंत जातो. अवजड वाहने याच मार्गावरून जात असल्याने मोठी वर्दळ असते. हा मार्ग चौपदरी असला तरी पनवेल परिसरात दुपदरीच आहे.
कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत, भिंगारी, काळुंद्रे व कोन या भागात नागरीकरणाबरोबरच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. परिणामी रस्ते अरुंद पडू लागले आहेत. कळंबोली स्टील मार्केट, खांदा वसाहत व आजीवली येथे रस्ता ओलांडताना आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. भरधाव वाहनांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. शहरातील वाहतूक कोंडीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सतत आवाज उठवल्याने शासनाने त्याची दाखल घेऊन रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.