शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

संचालकांची मालमत्ता जप्त करून ठेवी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 12:01 AM

बाळासाहेब पाटील : कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी अधिवेशनात प्रश्न उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते, असे लेखी उत्तर राज्याचे सहकार मंत्री शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले.पनवेल तालुक्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदार व खातेदारांना ठेवीची रक्कम तातडीने परत मिळण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, आशिष शेलार, समीर कुणावार, अमित साटम यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला. पनवेल तालुक्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेमध्ये ठेवीदार व खातेदारांच्या ठेवी सन २०१९ पासून बँकेतच अडकून पडल्या आहेत. खातेदार व ठेवीदारांची रक्कम परत देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते काय, अशी विचारणा करून या प्रकरणी चौकशी करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम तातडीने परत मिळण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा सवालही या आमदारांनी तारांकित प्रश्नाद्वारे केला.या प्रश्नावर बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात, बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते, असे स्पष्ट केले.

५९ कर्ज प्रकरणांची तपासणी करण्याचे २०१९ साली दिले होते आदेशरिझर्व्ह बँकेने २२ एप्रिल २०१९ रोजीच्या पत्रान्वये कर्नाळा बँकेच्या ५९ कर्ज प्रकरणांची तपासणी करण्याचे निर्देश सहकार आयुक्तांना दिले. त्यानुषंगाने सहकार आयुक्तांनी दिनांक १० मे २०१९ रोजीच्या आदेशान्वये जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग यांची नियुक्ती केली. 

रिझर्व्ह बँकेने नमूद केलेली ५९ कर्जप्रकरणे व जिल्हा विशेष लेखापरीक्षक रायगड-अलिबाग यांच्या तपासणीत आढळलेल्या इतर ४ असे एकूण ६३ कर्जप्रकरणी ५१२. ५४ कोटी एवढ्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल जिल्हा विशेष लेखापरीक्षक रायगड-अलिबाग यांनी सादर केला. त्यानुसार बँकेचे कर्जदार व संचालक अशा एकूण ६३ जणांविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, एम.पी.आय.डी. ॲक्ट व भारतीय दंड विधानअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) पुणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.