या श्वानाला न्याय मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2015 02:20 AM2015-11-30T02:20:52+5:302015-11-30T02:20:52+5:30

एका उद्दाम ट्रकचालकाने एकाच आठवड्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन श्वानांना धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

Will this devil get justice? | या श्वानाला न्याय मिळणार?

या श्वानाला न्याय मिळणार?

Next

जितेंद्र कालेकर, ठाणे
एका उद्दाम ट्रकचालकाने एकाच आठवड्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन श्वानांना धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या श्वानांना न्याय देण्याकरिता ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याकरिता चार श्वानप्रेमींनी पोलीस ठाणे गाठले. मात्र, श्वानांच्या अपघाताकरिता कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा, असा पेच पोलिसांसमोर उभा राहिला आहे.
ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कच्या कम्पाउंडमध्ये १४ ते २३ नोव्हेंबर या १० दिवसांच्या कालावधीत तीन वेळा श्वानांच्या अपघातांचा प्रकार घडला. मुंबई उच्च न्यायालयाने प्राण्यांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे अ‍ॅनिमल वेल्फेअर आॅफिसर मीत आशर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरच्या पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ‘राज वॉटर सप्लायर्स’च्या रवी या ट्रकचालकाने आयटी पार्कमधील एका श्वानाला धडक दिली. प्रचंड रक्तस्रावामुळे त्याचा २४ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. आशर आयटी परिसरातच त्याचा दफनविधी करण्यात आला.
दरम्यान, या अपघातापूर्वी १४ नोव्हेंबर रोजीही याच ट्रकचालकाने तिथल्याच एका भटक्या श्वानाला धडक दिली होती. त्या अपघातातून सुदैवाने तो कुत्रा बचावला.
पुन्हा याच ट्रकने २० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्याच कुत्र्याला धडक दिली. या वेळी मात्र त्या कुत्र्याच्या पुढच्या पायाला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सौरभ पाटील, नवीन नाडार, वैभव नायक आणि आशर या प्राणिमित्रांनी वसंत
विहार येथील डॉ. हेमंत गंगे यांच्या मदतीने उपचारही केले. या कुत्र्याचा जीव वाचला असला तरी तो चांगलाच जायबंदी झाला आहे. त्याच्यावर अद्यापही उपचार सुरूच आहेत.
पहिल्या वेळी चालकाकडून अनवधानाने असा प्रकार घडल्याची शक्यता गृहीत धरली तरी त्याच गाडीने दुसऱ्यांदा त्याच कुत्र्याला धडक दिली.
‘‘१४ नोव्हेंबरला ही घटना घडली, तर इतके दिवस आशर आणि त्यांचे सहकारी गप्प का बसले? इतरांच्याही गाड्या तिथून जातात. आमच्याकडे रवी नावाचा कोणी चालकच नाही. त्यांनी केलेले आरोप संशयास्पद वाटतात. ड्रायव्हरची चूक असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. आमच्या गाडीने जर अपघात केला असेल तर तसे पुरावे द्यावेत.’’ - मिलिंद मोरे, राज वॉटर सप्लायर्स, ठाणे

Web Title: Will this devil get justice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.