रेल्वे स्थानके खरोखर स्मार्ट होणार का?

By Admin | Published: December 26, 2016 06:41 AM2016-12-26T06:41:39+5:302016-12-26T06:41:39+5:30

कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यात, कल्याण-डोंबिवलीबरोबरच टिटवाळा स्थानकाचाही विकास होणार आहे.

Will railway stations be really smart? | रेल्वे स्थानके खरोखर स्मार्ट होणार का?

रेल्वे स्थानके खरोखर स्मार्ट होणार का?

googlenewsNext

कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यात, कल्याण-डोंबिवलीबरोबरच टिटवाळा स्थानकाचाही विकास होणार आहे. आज शहरातच धड सुविधा देता येत नाही, तेथे रेल्वे स्थानकांची काय गत? टिटवाळ्यासारख्या शहरात गृहसंकुले उभारली जात आहेत. यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. पण, येथे सुविधांचा अभाव आहे. शहाडला गर्दी आहे, पण तिला सामावून घेताना यंत्रणा कमी पडते. तीच गत आंबिवलीची. शहरे स्मार्ट करताना स्थानकेही कशी स्मार्ट होतील, याचाही विचार व्हायला हवा.

'टिटवाळा व मांडा या गावांच्या नावावरून पडले. माधवराव पेशवे यांच्या काळात उभारलेल्या महागणपती मंदिरामुळे टिटवाळा प्रसिद्ध आहे. कसारा मार्गावरील टिटवाळा हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. कल्याण-डोंबिवलीनंतर टिटवाळा शहराचा आज मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. सर्वसामान्यांची पसंती या शहराला मिळत असल्याने नवे गृहप्रकल्प आणि चाळींचे बांधकाम मोठ्या संख्येने सुरू आहे. त्यामुळे टिटवाळा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
टिटवाळा रेल्वे स्थानकात कल्याणच्या दिशेने पादचारी पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र, कसाऱ्याच्या दिशेने पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना रूळ ओलांडण्याशिवाय गत्यंतरच नाही. फलाट क्रमांक-३ वर अपंगांसाठी स्वच्छतागृहाची सोय केलेली आहे. तसेच पुरुष व महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह सामाजिक संस्थेला चालवण्याकरिता दिले आहे. त्याच्याशेजारीच एक जुनी पाण्याची टाकी आहे. तिचा लोखंडी पोल व पत्रा इतका गंजला आहे की, तो कधीही डोक्यात पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. फलाट क्रमांक-३ वरील पाणपोईचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी चार नवे नळ बसवले असले, तरी तेथे स्वच्छतेचा अभाव आहे. सतत माश्या घोंगावत असतात. लोकलमधून उतरल्यावर थेट बाहेर पडण्यासाठी कसारा दिशेकडील संरक्षक भिंत प्रवाशांनी तोडली आहे. अर्थात येथे पूल नसल्यामुळेही हे कृत्य प्रवाशांनी केलेले असावे. पूर्वेकडे रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर रिक्षा रांगेत उभ्या नसतात. परिणामी, तेथे नेहमीच वाहतूककोंडी असते. मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या टिटवाळा रेल्वे स्थानकात पाण्याची पुरेशी सोय रेल्वे प्रशासनाने केलेली नाही. स्थानकातील रेल्वे पोलीस कक्षाला भरदुपारी टाळे होते. अशाने प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत दुर्घटना किंवा महिलेवरील अत्याचाराची घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार?

Web Title: Will railway stations be really smart?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.